गाडगे बाबांचे 5 कीर्तने
गाडगेबाबा हे आधुनिक राष्ट्रीय संत म्हणून ओळखले जातात. संपूर्ण महाराष्ट्रात पदयाञा करून त्यांनी लोकशिक्षणाचे प्रबोधनाचे कार्य केले. स्वच्छता, करुणा आणि शिक्षण विवेकनिष्ठ मूल्ये समाजात रुजविण्याचे कार्य केले. बाबांचे काही वैचारिक कीर्तने.. *किर्तन १* बाबा :- देव किती? श्रोते :- एक. बाबा :- तुमच्या गावी खंडोबा आहे का? श्रोते :- आहे बाबा :- मग देव किती झाले श्रोते :- दोन बाबा :- तुमच्या गावी भैरोबा आहे का? श्रोते :- आहे बाबा :- मग आता देव किती झाले? श्रोते :- तीन बाबा :- तुमच्या गावी मरीआई आहे का? श्रोते :- आहे बाबा :- मग देव किती झाले श्रोते :- चार बाबा :- वेड लागले जगाला देव म्हणती धोंड्याला । बोला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला। *किर्तन २* बाबा :- श्रीखंड चांगले का बोकड? श्रोते :- श्रीखंड बाबा :- बासुंदी चांगली का बोकड? श्रोते :- बासुंदी बाबा :- दूध चांगले का बोकड? श्रोते :- दूध बाबा :- इथं असं बोलता अन् घरी जाऊन बोकडाचे मटण खाता. काय म्हणावं तुम्हाला? गुजराती मारवाडी कधी देवाला बकरे कापतात का? श्रोते :- नाही बाबा :- मग त्यांना देव कसा पावतो? अन् तु...