◼️व्यक्ती विशेष :- भारताचे राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जीवनी
“आपल्या मनाशी ठरविलेल्या संकल्पाला तडीस नेण्यासाठी आपल्याला आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ आणि एकाग्र व्हावे लागेल.” डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे स्वतंत्र भारताच्या राष्ट्रपती पदावर येणारे अकरावे तेसच राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क नसणारे पहिले व्यक्ती होते. भारताच्या प्रगतीसाठी त्यांनी दिले असलेले महत्वपूर्ण योगदान आणि त्यांनी केल्या असलेल्या उत्कृष्ट कामगिरींमुळे भारत देश आज सुद्धा त्याचं स्मरण करीत असतो. भारतातील जनतेच्या मनात त्यांच्याप्रती आजसुद्धा भरपूर आदर आहे. तसेच भरतीय जनतेचे ते सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती होते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे एयरोस्पेस वैज्ञानिक होते. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपले महत्त्वपूर्ण योगदान देऊन भारताला एक नविन दिशा दाखवली होती. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे खूप महान व्यक्ती होते. ते पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी ”अग्नी” मिसाईल चे उडाण करून आपल्या देशाची शक्ती संपूर्ण जगाला दाखवून दिली होती. याच करणामुळे त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. अब्दुल कलाम हे खूप दूरदृष्टीच...