नाते जपून ठेवा
🌹नाती जपून ठेवा स्वार्थ खूप झाला ,थोडी प्रीत पेरा गोफ सैल झाला.🌹 मित्रांनो , माणूस हा समाजशील प्राणी आहे . समाजाशिवाय त्याचे अस्तित्व शून्य आहे . फुलण्यासाठी रोपांना जशी मातीची तशी माणसाला समाजाची गरज असते . अनेक पाकळ्या जेव्हा एकसंघ फुलतात तेव्हा एक सुंदर फूल उमलतं . पण त्यातल्या काही पाकळ्या मिटल्या , कोमेजल्या वा गळून पडल्या तर फूल सौंदर्यविहीन , मूल्यहीन होतं . त्याचा जगण्याचा अर्थही संपतो . आपल्या जीवनाचं पुष्पही असंच नात्याच्या पाकळ्यांनी बहरत असतं . त्याची प्रत्येक पाकळी अनमोल असते . मी पाहिलेली , अनुभवलेली नात्यांची विलोभनीय उत्कटता शब्दांच्या कँमेरातून टिपण्याचा इथं प्रयत्न करतो आहे . || आई- वडील || सार्वकालीन सर्वश्रेष्ठ मानवी नातं पंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं आपल्या घराची जीवित दैवतं तीर्थाचे सागर , स्नेहाचे आगर आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती आपण जन्माला येण्याआधीच आपल्यावर प्रेमसिंचन करणारे स्नेह - निर्झर || गुरुजन || आपल्या भविष्याचे शिल्पकार आपल्या जीवनाचा प्रकाश अज्ञान दूर करणारे वासरमणी म...