◼️ धर्म शास्त्र :- संपूर्ण चौदा विद्या आणि चौसष्ठ कला कोणत्या...
चौदा विद्या आणि चौसष्ठ कला कोणत्या... आपल्या लाडक्या गणपतीला चौदा विद्या आणि चौसष्ठ कला यांचा अधिपती असे म्हटले जाते. साहजिकच या चौदा विद्या आणि चौसष्ठ कला कोणत्या ? याबद्द्ल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. ही धावती ओळख.. चौदा विद्या : चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र अश्या एकूण चौदा विद्या आहेत... वेद :- १. ऋग्वेद २. यजुर्वेद ३. सामवेद ४. अथर्ववेद सहा वेदांगे :- १. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र. २. ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या. ३. निरुक्त- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र. ४. कल्प- धार्मिक विधी- व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र. ५. छंद- शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्ताचे ज्ञान. ६. शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन. १. न्याय, २. मीमांसा 3. पुराणे 4. धर्मशास्त्र. चौसष्ट कला ६४ :- १. पानक रस तथा रागासव योजना - मदिरा व पेय तयार करणे. २. धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे. ३. दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे. ४. आकर ज्ञान - खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्...