Posts

Showing posts with the label चल गावाकडे

चल गावाकडे - कविता

खूप छान ग्रामीण कविता आहे , ☆☆☆☆☆ काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता , माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।। कशी ऊन्हात , ऊन्हात तळतात माणसं । कशी मातीत , मातीत मळतात माणसं । कशी खातात जिवाला खस्ता , माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।1।। काळ्या बापाचं , बापाचं हिरवं रानं । काळ्या माईनं , माईनं पिकवलं सोनं । पण त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता ।। माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।2।। ईथं डब्यात तुला साखर लागतीया गोड । तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड । पण भाव ठरतो त्याला न पुसता । माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।3।। जवा दुष्काळ , दुष्काळ घिरट्या घाली । तवा गावाला , गावाला कुणी न वाली । कसं सुगीत घालतात गस्ता , माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।4।। या भुमिचा , भुमिचा मुळाधिकारी । बाप झालाय , झालाय आज भिकारी । गाव असुन झालाय फिरस्ता , माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।5।। काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता , माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।।।।