तिन मित्र - बोधकथा
सहज एकदा फेरफटका मारताना वाटेत 😡"राग" भेटला मला पाहून म्हणाला ..... काय राव, आठवण काढत नाही हल्ली ? मी म्हणालो अरे नुकताच 😇"संयम" पाळलाय घरात आणि "माया" पण माहेरपणाला आली आहे. तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला. पुढे बाजारात 😏"चिडचिड" उभी दिसली गर्दीत. खरं तर ही माझी बालमैत्रीण पण पुढे कॉलेजात 😠"अक्कल" नावाचा मित्र मिळाला आणि हिच्याशी संपर्क तुटला. आज मला पाहून म्हणाली अरे 😣"कटकट" आणि😖 "वैताग" ची काय खबरबात ? मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा ! हल्ली मी 🙏🏻"भक्ती" बरोबर सख्य केलय त्यामुळे "आनंदा"त आहे अगदी पुढे जवळच्याच बागेत😫 "कंटाळा" झोपा काढताना दिसला. माझं अन त्याच हाडवैर.... अगदी 36 चा आकडा म्हणाना.... त्यामुळे मला साधी ओळख दाखवायचाही त्याने चक्क 😴 "आळस" केला. मीही मग मुद्दाम "गडबडी"कडे लिफ्ट मागितली आणि तिथून 🤕सटकलो. पुढे एका वळणावर 😟"दुःख" भेटलं मला पाहताच म्हणालं "अरे ये, तुझीच वाट पहात होतो" मी म्हणालो, "अरे वाट पहात होतास कि...