तिन मित्र - बोधकथा

सहज एकदा फेरफटका मारताना वाटेत 😡"राग" भेटला
मला पाहून म्हणाला .....
काय राव, आठवण काढत नाही हल्ली ?

मी म्हणालो अरे नुकताच 😇"संयम" पाळलाय घरात आणि "माया" पण माहेरपणाला आली आहे.

तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला.

पुढे बाजारात 😏"चिडचिड" उभी दिसली गर्दीत. खरं तर ही माझी बालमैत्रीण पण पुढे कॉलेजात 😠"अक्कल" नावाचा मित्र मिळाला आणि हिच्याशी संपर्क तुटला.

आज मला पाहून म्हणाली अरे 😣"कटकट" आणि😖 "वैताग" ची काय खबरबात ?

मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा !  हल्ली मी 🙏🏻"भक्ती" बरोबर सख्य केलय त्यामुळे "आनंदा"त आहे अगदी

पुढे जवळच्याच बागेत😫 "कंटाळा" झोपा काढताना दिसला. माझं अन त्याच हाडवैर.... अगदी 36 चा आकडा म्हणाना....
त्यामुळे मला साधी ओळख दाखवायचाही त्याने चक्क 😴 "आळस" केला.

मीही मग मुद्दाम  "गडबडी"कडे लिफ्ट मागितली आणि तिथून 🤕सटकलो.

पुढे एका वळणावर 😟"दुःख" भेटलं
मला पाहताच म्हणालं "अरे ये, तुझीच वाट पहात होतो"

मी म्हणालो, "अरे वाट पहात होतास कि वाट लावायच्या तयारीत होतास? आणि माझ्या बायकोपेक्षा तूच जास्त वाट बघतोस कि रे माझी" तसं 😌"लाजून" ते म्हणालं, "अरे मी पाचवीलाच पडलो (पाचवीला पुजलो) तुझ्या वर्गात.  कस काय सर्व ? घरचे मजेत ना?". 

मी म्हणालो, "छान" चाललय सगळं....... 👏🏻"श्रद्धा" आणि 👍🏻"विश्वास" असे दोन भाडेकरू ठेवलेत घरात त्यांच्या मदतीने मस्त चाललंय. तू नको "काळजी" करूस. हे ऐकल्यावर "ओशाळलं" आणि निघून गेलं.

थोडं पुढे गेलो तोच😊 "सुख" लांब उभं दिसलं तिथूनच मला खुणावत होतं,  धावत ये नाहीतर मी चाललो मला उशीर होतोय.....

मी म्हणालो, "अरे कळायला लागल्यापासून तुझ्याच तर मागे धावतोय उर फुटे पर्यंत, आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट झालीय..... एकदा दोनदा भेटलास पण 'दुःख' आणि 'तू' साटलोट करून मला एकटं पाडलत दर वेळी. आता तूच काय तुझी "अपेक्षा" पण नकोय मला. मी शोधलीय माझी "शांती" आणि घराचं  नावच "समाधान" ठेवलंय."
😡😏😇😠😫😲😴🤕😕😌😊

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...