🤔तुम्हाला माहीत आहे का ? राज्यपाल आमदार नसलेल्या व्यक्तीलाही मुख्यमंत्री बनवू शकतात
🤔 *तुम्हाला माहीत आहे का ? राज्यपाल आमदार नसलेल्या व्यक्तीलाही मुख्यमंत्री बनवू शकतात, ते असे* 💁♂️ नवीन सरकार निर्माण करण्याच्या प्रक्रियेत राज्यपालांचे महत्व घटनात्मकदृष्ट्या अनन्य साधारण आहे, जाणून घेऊया राज्यपालांच्या अधिकाराविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी... 🏫 संसदीय शासन पद्धतीत रूढ झालेल्या संकेतानुसार राज्यपाल हे विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करत असतात. 📓 मात्र, राज्यघटनेमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड आणि नियुक्तीविषयी कोणतीही विशेष पद्धत सांगितलेली नाही. कलम १६४ मध्ये फक्त एवढेच म्हटले आहे की, राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील. ⌛ विधानसभेमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत नसते, त्यावेळी सर्वात मोठ्या पक्षाच्या किंवा युतीच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल शपथ देतात आणि त्यांना एका महिन्याच्या आत विश्वासदर्शक ठराव घेण्यास सांगितले जाते. 👑 ठराव जिंकल्यास ते मुख्यमंत्री म्हणून कायम राहतात. अशा प्रकारे राज्यपालांनी स्वेच्छाधिकार वापरल्याची भारतात उदाहरणे आहेत. 🧐 मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यापूर्वी ...