जिवन विचार - 32
*आपल जीवन अस्थीर आहे. क्षणभंगुर आहे. आज आहे तर उद्या नाही. माणसाचं चित्त आणि वित्तही चंचल आहे.माणसाचं जीवित आणि तारुण्यही चंचल आहे. फक्त माणसाचे कर्म आणि कीर्ती चिरकाल टिकणारी आहे.* *पण माणसं नाहक नको त्या गोष्टींच्या पाठीमागे लागून जीवन उद्ध्वस्त करतात. कस्तुरी मृगाच्या ठायी कस्तुरी असते पण तो कस्तुरीच्या शोधात इकडं तिकडं धावत असतो . आपणही जीवनभर धरसोड वृत्तीन जगत असतो.* *आपल्या जीवनात जे मौल्यवान मोती आहेत त्याकडं न पाहता जगात विखुरलेल्या गारगोटीच्या पाठीमागे धावत असतो.* *थोडक्यात आपल जीवन आनंदाच सरोवर आहे सदासर्वदा आनंदी रहा मन प्रसन्न ठेवा व चांगले कर्म करा.*