नवरीसाठी भरपूर नवीन उखाणे | Marathi Ukhane For Bride
1) मंदिरात वाहाते, फुल आणि पान, … रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान. 2) छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन, … रावांचे नांव घेते, ऐका सारे जण. 3) गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशा, .. रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी. 4) माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने, .. रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे. 5) कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा, … रावांचे नांव घेते, सारे जण बसा. 6) रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा, … रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा. 7) खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, … रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद. 8) पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे, … रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे. 9) मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती, … रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती. 10) सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात, … रावांचे नांव घेते, …च्या घरात. 11) कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती, …रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती. 12) मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, … रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा. 13) संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला, … रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्या