🌜🌛चंद्राची माहिती
🌕 * चंद्राची माहिती * 🌕 *********************** पृथ्वीचा उपग्रह म्हणून चंद्र आपल्याला माहित आहे. अवकाशातील सर्वात जवळची वस्तू व रोज रात्री साथसंगत करत प्रकाशणारी सर्वात मोठी वस्तू म्हणूनही चंद्र जवळचा वाटतो. पण हा चंद्र परप्रकाशी आहे, हे सांगितल्यावरच लक्षात येते. चंद्र आकाशात नसेल ती रात्र म्हणजे अमावस्येची रात्र आपल्याला नकोशी वाटते. याउलट पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात फेरफटका करायला, गप्पा मारायला कोणीही आनंदाने तयार असते. सूर्यमालिकेतील ग्रहांना उपग्रह आहेत त्यांची निर्मिती बहुधा ग्रहांबरोबरच झाली असावी. चंद्र हा पृथ्वीच्या साथसंगतीनेच वावरतो. पृथभोवती २९.५३ दिवसांतच प्रदक्षिणा घालत याच्या पृथ्वीबरोबर सूर्यप्रदक्षिणाही चालू असतात. पण यात एक मोठा फरक आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो व बरोबर तेवढ्याच वेळात स्वतःभोवती देखील फिरतो ! त्यामुळे पृथ्वीवरून चंद्राची फक्त एकच बाजू सतत दिसत असते. याचा परिणाम तापमानावरही होतो. सूर्याच्या बाजूचे तापमान खूपच उष्ण म्हणजे १२० अंश सेंटीग्रेड असते तर दुसऱ्या बाजूला उणे १५३ अंश सेंटीग्रेड इतके अतिथंड तापमान...