🧐आयुष्यात या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
* Nandanshivani app | Tips & Tricks * ▪️ * मोह * : 👉 अत्याधिक मोह करणेही बरबादीचे कारण ठरू शकते. एखाद्या व्यक्तीचा जास्त लळा लागल्यास व्यक्ती चांगल्या-वाईट गोष्टींमध्ये फरक करू शकत नाही आणि त्या व्यक्तीच्या प्रत्येक चुकीच्या कामात मदत करत जातो. यामुळे आयुष्य बरबाद होऊ शकते. ▪️ *लोभ* : 👉 लोभी (लालची) व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी कुणालाही धोका देऊ शकतो. लोभामुळे व्यक्ती योग्य-अयोग्य गोष्टींचा निर्णय घेऊ शकत नाही आणि बरबाद होतो. ▪️ *क्रोध* : 👉 रागामध्ये व्यक्तीला चांगल्या-वाईट गोष्टीची पारख होत नाही. रागामध्ये व्यक्ती विचार न करता चुकीचा निर्णय घेतो. यामुळे ही सवय लगेच सोडून द्यावी. ▪️ *अत्याधिक प्रेम* : 👉 कोणत्याही गोष्टींमध्ये अति करणे वाईट आहे. कोणावरही गरजेपेक्षा जास्त प्रेम करणे चुकीचे ठरते. खूप जास्त प्रेमामुळे व्यक्ती चुकीचे निर्णय घेतो. यामुळे कोणावरही गरजेपेक्षा जास्त प्रेम करू नये. ▪️ *अहंकार* : 👉 कधीही आपल्या शक्ती आणि धनाचा अहंकार करू नये. अहंकारमध्ये व्यक्ती असे काही बोलून जातो, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो.