जिवन विचार - 99
माणसं जोडणं म्हणजे माणसांना प्रभावित करणं,माणसांवर प्रभुत्व गाजवणं नव्हे. माणसं जोडणं म्हणजे मनमोकळं,मतमोकळ असणं.मनाच मनाशी नात जोडणं.माणसं जोडणं म्हणजे अंतरीच्या जिव्हाळ्यासाठी जिवंत निमित्त शोधणं. आपल्या व्यक्तित्वातील काटे इतरांना बोचणार नाहीत,याची दक्षता घेणं. सहज,स्वाभाविक,वागणं,पण स्वभाव बदलताही येतो,याची जाण ठेवणं..!!