जिवन विचार - 26
🌺🍁विचारपुष्प🍁🌺 〰〰〰〰〰〰〰 आपल्या जीवनातून काही काढुन दुसऱ्यासाठी देतो तेव्हा ते खरंखुरं दान असतं. अनेकदा दानदेखील माणसाला नादान बनवतं. दान देणाऱ्याचेही काही प्रकार असतात. दर्या--खोर्यातील सदाबहार फुल🌹🌺🌸🌼🌷🌻🌹 जसा आपला सुगंध सर्वत्र पसरवितात, डोंगराळ भागातून खळखळ वाहणाऱ्या निर्झरातून तहानलेली माणसं जशी तृप्त होतात तशी त्या फुलासारखी आणि निर्झरासारखी दान देणारी माणसं श्रेष्ठ असतात.🙏 खरं तर मुक्त असताना दान देणाऱ्याला देण्यातील आनंदापेक्षा कधीकधी दान घेणाऱ्याचा शोध करण्यात अधीक आनंद 😀असतो.