जाणून घ्या पुरूष बुरखा घालतात तो देश - अजब गजब
येथे महिलांना आहे आझादी, अन पुरुष बुरख्यात बंदिस्त. ट्वारेग हा एक प्रदेश आहे जेथे याच नावाची जमात राहते. लिबिया, अल्जेरीया देशाच्या दक्षिणेस अन माली देशाच्या सीमेस लागून, सहारा वाळवंटात या ट्वारेग जमातीतील लोक समूहाने राहतात. इस्लामिक धर्माचा अनुनय करणाऱ्या या जगावेगळ्या प्रदेशाची लोकसंख्या वीस लाख आसपास आहे पण आसपासच्याच नव्हे तर आपल्या सारख्या दूर दूरच्या देशांच्या कोटी कोटी लोकांना कुतूहल वाटेल असे त्यांचे वागणे आहे. *▪ पुरुषांना बुरख्याची सक्ती :* ट्वारेगमध्ये जरी पुरुष प्रधान संस्कृती असली तरी स्त्रियांसाठी असलेले त्यांचे विचार अन नियम हे जगावेगळे आहेत. त्यतीलच बुरख्याबाद्द्लचा त्यांचा नियम. येथे पुरुषांना चक्क बुरखा घालूनच फिरावे लागते. कोणीतरी वाटेल की वाळवंटात हे गरजेचे आहे तर ते तसे नाही कारण कोणतीही ट्वारेग मुलगी, स्त्री तुम्हाला बुरख्यात दिसणार नाही. गम्मत म्हणजे याच बुरखाधारी ट्वारेग पुरुषांना “निळे पुरुष” असेही नाव पडले होते कारण “नीळ” मध्ये रंगवलेले बुरखे सतत...