Posts

Showing posts with the label सत्ता संपत्ती चा मोह अमर्यादित असतो - बोधकथा

सत्ता संपत्ती चा मोह अमर्यादित असतो - बोधकथा

मानवी मस्तक आणि पोलादी पाय असणारा तो राक्षसी वृत्तीचा प्राणी जेव्हा सहदेवसमोर आला, तेव्हा त्यालाही जरा आश्चर्य वाटले. जंगलातून भ्रमंती करताना असा माणूस भेटेल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. सहदेवने त्याला त्याची दिनर्चा, आहार यांविषयी विचारले, तेव्हा तो प्राणी म्हणाला, ‘मी भुखंड खातो आणि समुद्राचे पाणी पितो, तसा मी अत्यंत सुखी आहे. सर्व भौतिक सुविधा मला उपलब्ध आहेत, माझ्या या आहारासाठी मी अनेक भूखंड आरक्षित केले आहेत. पण तरीही मला भविष्याची चिंता छळते आहे.’ यावर सहदेव म्हणाला, ‘कस बां? अशी चिंता तुला का पडावी?’ तो अजब माणूस म्हणाला, ‘आज जरी मला प्रचंड जमीन व अमर्याद पाणी उपलब्ध असले तरी हे सारे गिळंकृत केल्यानंतर काय खाऊ, हा प्रश्न मला छळतो आहे.’   तात्पर्य - सत्ता, संपत्ती आणि सन्मान यांचा लोभही असाच अमर्याद असतो, तो कधीच संपत नाही.