Posts

Showing posts with the label सत्कर्म - बोधकथा

सत्कर्म - बोधकथा

जगज्जेता अलेक्झांडर जवळजवळ संपूर्ण जग जिंकून आपल्या सैन्यासह माघारी आपल्या देशात परतत होता. परंतु जाताना तो अतिशय गंभीर आजारी झाला. अनेक उत्कृष्ट उपाय करूनही आजारातून बरे होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. जिंकलेले संपूर्ण साम्राज्य, एवढी मोठी शूर सेना, आपली जगज्जेती तीक्ष्ण तलवार आणि अमाप संपत्ती, ह्या सर्वांचा त्याग करून आपणाला आता मृत्यूला सामोरे जावे लागणार ह्याची त्याला जाणीव झाली. आपण आता कोणत्याही परिस्थितीत आपल्या मायदेशी जीवंत पोहचू शकत नाही हे त्याला कळून चुकले. मृत्यूच्या शेवटच्या घटका मोजत असताना त्याने आपल्या सरदाराला पाचारण केले आणि म्हणाला ” मी आता लवकरच हे जग सोडून निघून जाणार आहे, माझ्या तीन इच्छा आहेत आणि त्या पूर्ण करण्याची सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे." सरदाराला साश्रूपूर्ण होय म्हणण्याशिवाय गत्यंतर नव्हते. अलेक्झांडर म्हणाला: *१*. माझी पहिली इच्छा “ माझ्या खाजगी डॉक्टरनेच माझी शवपेटी एकट्यानेच उचलून न्यावी” *२*. माझी दुसरी इच्छा “ माझी शवपेटी स्मशानभूमीवर नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून ठेवावे” *३*. आणि माझ...