बुद्धांचे 10 मौल्यवान विचार...
*1.* संशय करण्याची सवय चांगली नसते. संशय नात्यांमध्ये दुरावा आणतो. संशय नवरा बायकोच्या नात्यामध्ये, दोन जिवलग मित्रांच्या नात्यामध्ये तसेच दोन प्रेम करणाऱ्यांचा नात्यामध्ये दुरावा आणतो. या वाईट सवयी पासून नेहमीच लांब राहायला हवे. *2.* आपण एखाद्या गोष्टीवर चिडतो. त्याचा रागराग करतो. राग मनामध्ये ठेवल्यास सत्याचा मार्ग सोडून वाईट मार्गाकडे वळतो आणि स्वार्थी बनतो. त्यामुळे स्वतःचे खरे करू लागतो. या साठी राग करणे टाळावे. *3.* कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती भंग करते. *4.* अज्ञानी माणूस बैलाकार असतो. फक्त आकारानेच मोठा असतो पण मनाने खूप लहान असतो. *5.* राग मनात ठेवणे म्हणजे जळत्या कोळसा आपल्या हाती धरून कोणावर टाकणे. असे केल्याने आपलेच हात भाजतात, ह्याची जाणीव राग मनात ठेवणाऱ्याला ठाऊकच नसते. *6.* ज्या प्रकारे या संसारात आनंद आणि सुख जास्त काळ टिकून राहत नाही त्याच प्रमाणे दुःख पण जास्त काळ राहत नसतं. आपण दुःख रुपी अंधारात आहात आणि वाईट काळ आपल्याला भोगावे लागत असल्यास आपल्याला चांगले विचार ठेवले पाहिजे. त्यामधून मार्ग शोधले पाहिजे. *7...