Posts

Showing posts with the label बोधकथा

◼️ बोधकथा :- उकराल माती तर पिकतील मोती

Image
        एक गाव होतं.कामेगाव त्याच नाव .गाव कसं ? खेडेगावच म्हणा ना ! इनमिन  तीस - चाळीस घरे असतील तिथे . सगळ्यांना शेतीवाडी भरपूर.किसन नावाचा शेतकरी तिथेच रहायला होता.चांगली चाळीस एकर शेती होती त्याला.राधा त्याची बायको.दोघेही घाम गाळून शेतीत राबायचे.देवानं चारं लेकरं दिली पदरात त्यांच्या.पोरांवर त्यांचा खूप जीव.राधा तर पोरच आहेत म्हणून लाड करायची. किसन म्हणायचा ,"अगं राधे,लै लाडकोड नगं करू .जरा त्यांना बी कष्टाची जाणीव व्हवू दे ." पण आईचा जीव कुठं ऐकतय ? ती आपली दुर्लक्ष करायची . पोरं शिकतील,मोठी सायब , नोकरदार होतील , असे स्वप्न ती बघायची.दिवसामागून दिवस चालले.पोरं लाडानं शेफारली.वयानं मोठी झाली पण कामं करायची त्यांना माहीत नव्हती.आळशी बनले सारेच.         किसनच्या हातात आता काठी आली.राधेच्या पण डोळ्यांवर चष्मा आला.लेकरांच्या काळजीने ,विचाराने तिला बेचैन व्हायचे.ती किसनकडे तिच्या भावनांचा निचरा करायची.एके दिवशी अचानक किसनची तब्येत बिघडली.त्याने पोरा़ंना जवळ बोलावले आणि म्हणाला,"बाबांनो , मला आता बोलावणं आलंय , माझ्या माघारी आईला सांभाळा, तुम्हाला क

◼️ बोधकथा :- घरोघरी मातीच्याच चुली

Image
  प्रेरणा साहित्यिक परिवार तर्फे आयोजित म्हणीवर आधारित बोधकथा स्पर्धा मीनलचे लग्न (घरोघरी मातीच्या चुली) घरोघरी मातीच्याच चुली          रामराव एकदाचा या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्याच्या तयारीनेच शेतात आले होते. त्यांचे शेत गावा पासून थोडेसे दूर नदीच्या काठी होते. सुंदर वृक्षवेली, नदीचा खळखळता प्रवाह, दाट झाडी यामुळे तो परिसर एकांतप्रिय लोकांसाठी अतिशय आवडता होता. प्रेमी युगुले त्या ठिकाणी प्रेमाराधना करण्यासाठी हमखास तेथे यायचे. कधी तरी ते रामरावांच्या नजरेलाही पडायचे.          गणपतरावांची मुलगी पळून गेल्यापासून रोज पारावर याबद्धल चर्चा व्हायची. प्रत्येकजण एक दुसऱ्याला दोषी ठरवायचा. मुलांवर चांगले संस्कार करता येत नाही का? आई वडील झोपा काढतात का? असे सवाल चर्चेमध्ये असायचे. ज्याच्या मुलीचे किंवा मुलाचे प्रकरण पुढे येईल त्याला मेल्याहून मेल्या सारखे व्हायचे. जो जास्त साव होऊन बोलायचा त्याचेच एखादे प्रकरण दुसऱ्या आठवड्यात समोर यायचे. रामरावचे शेत जवळ असल्यामुळे त्यांना बऱ्याच प्रकरणांची माहिती सगळ्यात अगोदर मिळायची, तसेच ती सखोलही असायची.         बड्या असामीच्या घर

◼️ बोधकथा :- भाव तेथे देव

         ईश्वराची पूजा म्हणजे अज्ञानातून मुक्ती, अंधश्रद्धा तिलांजली,संस्कारांना उजाळा,विद्येची उपासना ,जिभेवर गोडीअमृताची तर डोळ्यात भक्तीची निरांजने तेवत ठेवण्याचा उत्तम मार्ग होय.गेल्या सहा महिन्यांपासून आपण करोना या व्हायरस विरोधात झुंजत आहोत .आपण सर्वांनी मिळून या महामारी विरोधात शांतपणे घरात राहून सहकार्य करायचे आहे.        नरसिंगपूर निरा भीमा नदीच्या संगमावर वसलेले एक छोटे गाव आहे त्या गावात नरसिंहाचे मोठे दगडी मंदिर आहे.त्या मंदिरात रोज पूजा, आरती, नेवैद्य सारे काही जे गुरुजी करायचे त्यांना बडवे म्हणतात.ते रोज नित्य नियमाने पुजा आरती नेवैद्य करत आहे. पण लॉक डाऊन मुळे सर्व मंदिरे बंद करण्यात आली अर्थात हे करणेच योग्य होते.पण बडवे काकांना मंदिरात जाऊन देवाचे सर्व काही करण्याची सवय गेली चाळीस वर्षांपूर्वी पासून सुरु होती, मंदिरात शांत वातावरण असायचे त्यामुळे तेथेच  जप करीत असत          आता शासनाने सर्व धार्मिक ठिकाणे बंद केल्यामुळे बडवे काकांना आता वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडला. चार दिवस खूप विचार केला , तेव्हा त्यांनी ऑनलाईन मोफत संस्कृत श्लोक शिकविण्यास आरंभ केला.मुले, म

◼️ बोधकथा :- बळी तो कान पिळी

Image
एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात बरेच प्राणी राहत होते. एके दिवशी अस्वल, लांडगा, कोल्हा, सिंह शिकारीसाठी एकत्र निघाले. सिंह त्या तुकडीचे नेतृत्व करत होता. जंगलात फिरता फिरता त्यांना एक म्हैस दिसली.. ..... त्या चौघांनी मिळून अथक प्रयत्नाने म्हशीला पकडले.. आणि ठार मारले.. कोल्ह्याने म्हशीच्या मासाचे चार समान भाग केले. प्रत्येक जण हर्षाने नाचत होता. आज आपल्याला भरपूर शिकार मिळाली. चला!!आपण आता त्याच्यावर येथेच्छ ताव मारु.!!  आपल्याला मिळालेल्या वाटेचे खाण्यासाठी सगळेजण  उतावीळ झालेले होते.. "आशाळभूत" नजरेने ... म्हशीच्या मांसाकडे बघत होते.. ..... इतक्या जंगलचा राजा सिंह याने मोठी गर्जना केली." तो म्हणाला" ते भाग बाजूला ठेवा. "मी काय सांगतो आहे ते तुम्ही नीट ऐका.." ..... सगळेजण चमकले... वनराजाचे म्हणणे शांतपणे ऐकून लागले.. दोस्त हो!! यातील एका भागावर माझा हक्क आहे.. कारण शिकारीत मी तुमच्या बरोबर सहभागी झालो.  सगळे म्हणाले अगदी बरोबर ....दुसऱ्या भागावर ही माझाच अधिकार आहे कारण शिकार करताना मी तुमचं नेतृत्व केलं होतं. सगळेजण म्हणाले अगदी बरोबर ... त

◼️ बोधकथा :- ✨गैरसमज

सॉक्रेटिस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता. एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला, "अहो...  तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास माहीत आहे की नाही ? " " भल्या माणसा , थोडा वेळ थांब , "  साॅक्रेटिसने त्याला थांबवले.  " कोणतीही गोष्ट ऐकण्यापूर्वी मी ती माझ्या तीन गाळण्यातून गाळून घेतो व नंतर ऐकतो. " " तीन गाळण्या...? काय, आहेत तरी काय त्या?" " हे पहा, माझे पहिले गाळणे आहे , माहितीची सत्यता ! तुम्ही जे मला सांगणार आहात ते स्वत: पाहिले आहे काय ? " " नाही , मी ऐकले आहे ." तो माणूस बोलला . " ठीक आहे ." सॉक्रेटिस म्हणाला .  " आता दुसरे गाळणे. मला असे सांगा की ते माझ्या मित्राबद्दल चांगले आहे की वाईट आहे ?" " ओ ... खरे तर ते चांगले नाही !" तो माणूस बोलला . " म्हणजे तुम्ही अशी गोष्ट सांगणार आहात जी माझ्या मित्राबद्दल वाईट आहे , मात्र तिच्या सत्यतेबद्दल तुम्हाला कांही माहीत नाही ! बरोबर ? " साॅक्रेटिसने विचारले .  " ठीक आहे . आता आपण तिसरे गाळणे लावूया. कदाचित त्या

◾बोधकथा :- विठू माऊली...| Prayerna blog

Image
एकटे पणा घालवण्यासाठी म्हणून जवळच्या विठ्ठल मंदिरात गेलो. सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आलो|विसरून गेले देहभान. घंटा वाजवली व डोळे भरून त्याच्या कडे बघितले... आणि मला जाणवले.. हा युगान युगे एकटाच उभा आहे. मंदिरात याला कधी एकटे पणा जाणवला नसेल.. त्याला मी म्हणाले अरे युगान युगे एकटा उभा असतोस कमरेवर हात ठेवून... कधी थकत नाहीस का? कधी एकटे वाटत नाही तुला... विठू माउली तू जगाची माउली सावळी मुर्ती विठ्ठलाची... विठू बोलू लागला कसा थकू बाबा मी... सगळ्या विश्वाचा भार माझ्यावर मग थकून कसे चालेल... एकटा असतोच कुठे. दिवसभर एवढे भक्त येतात आपले गाऱ्हाणे घेऊन.. त्यात एकटे पणा जाणवत नाही. आणि रात्रभर प्रत्येकाचे काय मागणे आहे याची उजळणी करायची असते... सांग एकटेपणा जाणवू शकतो का? तू पण ऐक विठू माझा लेकूर वाळा, संगे गोपाळांचा मेळा. तू पण माझे ऐक एकटेपणाच्या विळख्यातून बाहेर पड.. तुला जे आवडेल त्यात मन रमव बघ एकटे पणा जातो का नाही.. अरे या संसारात दोघा पैकी एक आधी जाणारच... म्हणून काय रडत बसायचे. पुढे पुढे चालत रहायचे आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मंदिराचा गाभार

◾विशेष लेख :- प्रतिसृष्टी निर्माण करणारे दोन देवदुत पती पत्नी !

Image
आपल्या अवतीभवती वाटोळं झालेला निसर्ग, दुषित झालेलं पर्यावरण, प्रदुषित हवा-पाणी-जमिन ह्या सगळ्यांकडे बघुन आपण सर्वजण अस्वस्थ होतो. हळहळतो, सुस्कारे सोडतो, आणि नजर फिरवुन आपल्या कामाकडे वळतो. एकीकडे शहरी भागात कोरडं, नीरस आणि शुष्क जीवन तर दुसरीकडे जंगल आणि वनांच्या वेगळ्याच समस्या आहेत, तुफान वेगाने होणारी भरमसाठ वृक्षतोड, कोवळ्या, निष्पाप वन्यप्राण्यांच्या हक्काच्या घरांचा नाश, हत्ती असो वा वाघ सिंह, शिकाऱ्यांनी क्रुरपणे केलेल्या प्राण्यांच्या कत्तली, कुठल्याही संवेदनशील माणसाला अवस्थ करतात. पण ह्या जगात काहीकाही लोक खरोखर अदभुत आणि असामान्य असतात, आपल्या कर्तुत्वाने ते आपल्यासमोर का जगावं आणि कसं जगावं? ह्याचा धडा घालुन देतात.   जेव्हा कोट्यावधी आणि अब्जावधी जनता मी आणि माझं बघण्यात धन्यता मानते, तेव्हा काही दैवी व्यक्तीमत्व मात्र स्वार्थानं लडबडलेलं तुच्छ जीवन त्यागुन एक भव्य आणि उदात्त संकल्प घेऊन आपले अख्खे आयुष्य त्या ध्येयासाठी वाहुन घेतात, हे आजकाल तसं विरळच!  आणि पायाशी सगळ्या सुखसुविधा लोळण घेत असताना, त्यांचा त्याग करुन एक अनिवासी भारतीय जोडपं मागच्या पंचवीस

◾विशेष लेख :- शुभ दुपार... एक लेख अवश्य वाचा | prayerna Blog

Image
रोजच्यासारखा अलार्म १५ मिनिटं स्नुझ केला आणि कूस बदलली. बघते, तर समोर खुर्चीत हा बसलेला. पिटुकला, गोजीरा. गोड हसून म्हणाला, 'सुप्रभात. ओळ्खलस का मला?' मी गोंधळलेलीच. तोच म्हणाला, 'दिवसरात्र माझा उद्धार करत असतेस आणि मला ओळखलं नाहीस? मी कोरोना.'  मला हसायलाच आलं. 'तोंड पाहिलंयस आरश्यात? तो कोरोना किती भयंकर दिसतो! अक्राळ विक्राळ चेहरा, आग ओकणारे डोळे. ईई. पाहिलंय मी न्युज चॅनल्स वर'... 'तुझा अजून ह्या चॅनेल्सवर विश्वास आहे???' त्याने इतकं ठासून विचारलं की मी वरमलेच. दुसऱ्या क्षणी तंतरली ना माझी. 'बापरे! माझा मास्क कुठाय.... स.. स.. सॅनिटायझर???'  'किती हायपर होत्येस? इतक्या वेळात काही केलं का मी तुला? सोशल डिस्टन्स ठेवून बसलोय ना? ऐक, मला कौंसेलिंग हवंय. खूप डिप्रेशनमध्ये आहे मी.'  फेकू नकोस.तुला कसलं डोंबलाच डिप्रेशन?'  'सगळे राग राग करतात माझा. नकोसा झालोय मी सगळ्यांना. सारखं गो कोरोना गो. माझ्या मित्रांनी पण टाकलंय मला!!'😢   'तूझे मित्र??'  'मग! Falsifarum, vivax , h1n1 ,HIV, ebola, ecoli... कुणी

बोधकथा :- संवाद देवाशी

Image
देवासमोर उभा होतो हताश मी हात जोडून डोळ्यामध्ये पाणी होते मनातून पूर्ण मोडून “देवा !” मी म्हणालो, “काय करू कळत नाही” ... “प्रश्नाच उत्तर मिळत नाही” “विश्वास ठेव” देव म्हणाला “देवा सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत” “विश्वास ठेव” देव म्हणाला “देवा आज असं वास्तव आहे जिथे आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही तर कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे याचा तुझ्याकडे काय पुरावा ? ” शांतपणे हसत देव मला म्हणाला “पक्षी उडतो आकाशात, आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा, खाली न पडण्यावर” “मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देतो विश्वास असतो तेव्हा तुझा रोप जन्म घेण्यावर” “बाळ झोपते खुशीत, आईच्या कुशीत, विश्वास असतो त्याचा, तिने साम्भाळून घेण्यावर” “उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मीटतो, विश्वास असतो तेंव्हा तुझा पुन्हा प्रकाश होण्यावर” “आज माझ्या दारी येऊन, आपलं मनातलं दुखः घेऊन, विश्वास आहे तुझा कारण मी हाक ऐकण्यावर” “असाच विश्वास जागव मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात” “आजची स्थिती अशीच राहील,असं कुठेही लिहिलेल नाही उद्याच चित्र कसं राहील, तू काहीच पाहीले

बोधकथा :- आधीच्या पिढीने शिकवले

Image
मी अजूनही शिकतोय ! दोन्हीची कॉकटेल बनवली तर आयुष्य सुखाचे होईल !! आधीच्या पिढीकडून पैसे वाचवायला शिकलो; नंतरच्या पिढीकडून पैसा वापरायला शिकतोय. आधीच्या पिढीकडून सहवासाने नाती जपायला शिकलो; नंतरच्या पिढीकडून डिजिटली नवीन नाती जोडायला शिकतोय. आधीच्या पिढीकडून मन मारून जगायला शिकलो; नंतरच्या पिढीकडून मन भरून जगायला शिकतोय. आधीच्या पिढीने, Use and use more मधली उपयुक्तता शिकवली; नंतरच्या पिढीकडून Use and throw मधली नावीन्याची गंमत अनुभवायला शिकतोय. आईकडून पिकनिकलाही घरच्या पोळीभाजीची लज्जत अनुभवायला शिकलो; मुलांकडून घरात असतानाही पिकनिक एंजॉय करायला* शिकलोय. आधीच्या पिढीबरोबर *निरांजन लावून दिवा उजळून वाढदिवस साजरा केला;* नंतरच्या पिढीबरोबर मेणबत्ती विझवून अंधार करून वाढदिवस साजरा करायला लागलो. आधीच्या पिढीने बिंबवले, घरचेच लोणी सर्वात उत्तम; नंतरची पिढी पटवून देत आहे, अमूल बटरला पर्याय नाही‌. थोडक्यात काय, आधीच्या पिढीने शिकवले, अधिक वर्षे कसे जगायचे ते; तर नंतरची पिढी शिकवत आहे, मरणापर्यंत आनंद घेत कसं जगायचं ते !! 🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐

बोधकथा :- प्रार्थना

Image
आत्म्याचा आवाज... परमात्म्या पर्यंत घेऊन जाणारा... संदेशवाहक... म्हणजे.... प्रार्थना ...🌷      एक गरीब, वृद्ध महिला एका भाजीवाल्याच्या दुकानात गेली..... तिच्यापाशी भाजी विकत घेण्यासाठी पैसे नव्हते....  तिने दुकानदाराला विनंती केली.... तिच्यापाशी पैसे नसल्याने त्याने तिला आज उधारीवर भाजी द्यावी.... पण दुकानदार काही या साठी तयार झाला नाही...  तिने त्याला अनेक वेळा उधारीवर भाजी देण्यासाठी विनंती केली.... शेवटी चिडून तो म्हणाला, "ए म्हातारे, तुझ्यापाशी पैसे नसतील तर मग तुझ्याजवळील अशी एखादी किंमती वस्तू तराजूत टाक की जिच्या मोबदल्यात मी तुला त्या वस्तूच्या वजनाइतकी भाजी देईन....       ती वृद्ध महिला थोडी विचारात पडली.... तिच्यापाशी देण्यासारखे काही नव्हतेच ... तर ती बिचारी देणार तरी कुठून ?.... थोड्या वेळाने तिने तिच्याजवळील एक कोरा, चुरगाळलेला कागदाचा तुकडा काढला .... त्यावर काहीतरी खरडले आणि तो तुकडाच तिने तराजूच्या पारड्यात टाकला.... हे पाहून दुकानदाराला हसू आले.... त्याने थोडी भाजी हाती घेऊन तराजूच्या दुसऱ्या पारड्यात टाकली आणि नवलच घडले..... कागदाचा कपटा टाकलेले पारड

बोधकथा :- ब्राह्मण आणि पत्नी

Image
एका ब्राम्हणाने पत्नीला विचारले... " पाणी छान आणि थंड आहे. आपल्या घरात फ्रिज नाही, कुठुन आणलेस..?" पत्नीः-  "शेजारच्या कुंभारा कडुन.!" ब्राम्हण ः-   काय..? त्या शुद्राचे पाणी मला पाजलेस, तुला लाज वाटत नाही...? आपण ब्राम्हण आहोत... आपल्याला शुद्राचे काही चालत नाही..?" पत्नीः- (घाबरली व म्हणाली) " मला माफ करा, या पुढे अशी चुक होणार नाही.... [दुस-या दिवशी.] ब्राम्हण ः-  "अग...  जेवायला वाढ..!" पत्नीः  "काही-नाही..!" ब्राम्हण ः-  "काय...? पोळी केली नाही..?" पत्नीः- " नाही....!  कारण... तवा व चुल शुद्र लोहाराने  व चुल कुंभाराने बनवलेली असल्याने मी त्या वस्तू  फेकून दिल्या..!" ब्राम्हण ः- "वेडी आहेस काय..? बरं दुध आण..!" पत्नीः-  "मी दुध फेकुन दिले  कारण....  ते शुद्र गवळ्याने दिले.  मी म्हटले  'उद्या पासुन दुध आणू नकाे' आम्हांला शुद्रांचे काही चालत नाही..!" बाम्हणः बर मी बाहेर चाललोय माझी चप्पल कुठे आहे.....??? पत्नीः ते मी बाहेर टाकले. . ब्राम्हण : का????? पत्नी : ते चप्पल तुम्हाला

निबंध :- दगड

Image
शाळेत बाई म्हणाल्या : आपल्या आवडत्या विषयावर निबंध लिहा.. एका मुलाने निबंध लिहिला... विषय -                   दगड                     ____________________________________ 'दगड' म्हणजे 'देव' असतो.. कारण तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे असतो.. पाहीलं तर दिसतो.. अनोळख्या गल्लीत तो कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो.. हायवे वर गाव केव्हा लागणार आहे ते दाखवतो.. घराभोवती कुंपण बनून रक्षण करतो.. स्वैयंपाक घरात आईला वाटण करून देतो..  मुलांना झाडावरच्या कैऱ्या, चिंचा पाडून देतो.. कधीतरी आपल्याच डोक्यावर बसून भळाभळा रक्त काढतो आणि आपल्या शत्रूची जाणीव करून देतो.. माथेफिरू तरुणांच्या हाती लागला तर,, काचा फोडून त्याचा राग शांत करतो.. रस्त्यावरच्या मजुराचं पोट सांभाळण्यासाठी स्वत:ला फोडुन घेतो.. शिल्पकाराच्या मनातलं सौंदर्य साकार करण्यासाठी छिन्निचे घाव सहन करतो.. शेतकऱ्याला झाडाखाली क्षणभर विसावा देतो.. बालपणी तर स्टंप, ठिकऱ्या, लगोरी अशी अनेक रूपं घेऊन आपल्याशी खेळतो.. सतत आपल्या मदतीला धावून येतो, देवा'सारखा.. मला सांगा,, 'देव' सोडून कोणी करेल का आपल्यास

बोधकथा :- प्रारब्ध आणि संगत

Image
माणसाची ओळख ही त्याच्या संगती वरून ठरते. तुम्ही दोन पोपटाची गोष्ट वाचलीच असेल. एक चोरा जवळ राहतो आणि एक साधू जवळ दोघांच्यात झालेला बदल तुम्हाला माहित आहेच  ! ... खाली असाच एक लेख आहे ...   💐🌸💐 एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळली. पुढे त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, " अरे तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस तर उदया तू माझ्या घरी जेवायला ये." भुंगा दुस-या दिवशी तडक त्याच्याकडे गेला पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खायची सुद्धा वेळ आली. आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उदया माझ्याकडे ये!.. दुस-याच दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला. भुंग्याने येताच क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं. किड्याने परागरस चाखला.किती भाग्यवान मी!...अस म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला. ते गुलाब तोडलं आणि मंदिरातल्या देवाच्या चरणांवर अर्पण केलं. किड्याला भगवानाचे दर्शन झालं तो धन्य झाला कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं