◾बोधकथा :- विठू माऊली...| Prayerna blog

एकटे पणा घालवण्यासाठी म्हणून जवळच्या विठ्ठल मंदिरात गेलो. सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आलो|विसरून गेले देहभान.
घंटा वाजवली व डोळे भरून त्याच्या कडे बघितले... आणि मला जाणवले..
हा युगान युगे एकटाच उभा आहे. मंदिरात याला कधी एकटे पणा जाणवला नसेल.. त्याला मी म्हणाले अरे युगान युगे एकटा उभा असतोस कमरेवर हात ठेवून... कधी थकत नाहीस का? कधी एकटे वाटत नाही तुला...
विठू माउली तू जगाची माउली सावळी मुर्ती विठ्ठलाची...
विठू बोलू लागला कसा थकू बाबा मी... सगळ्या विश्वाचा भार माझ्यावर मग थकून कसे चालेल... एकटा असतोच कुठे. दिवसभर एवढे भक्त येतात आपले गाऱ्हाणे घेऊन.. त्यात एकटे पणा जाणवत नाही. आणि रात्रभर प्रत्येकाचे काय मागणे आहे याची उजळणी करायची असते... सांग एकटेपणा जाणवू शकतो का? तू पण ऐक
विठू माझा लेकूर वाळा, संगे गोपाळांचा मेळा.
तू पण माझे ऐक एकटेपणाच्या विळख्यातून बाहेर पड..
तुला जे आवडेल त्यात मन रमव बघ एकटे पणा जातो का नाही..
अरे या संसारात दोघा पैकी एक आधी जाणारच...
म्हणून काय रडत बसायचे. पुढे पुढे चालत रहायचे आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मंदिराचा गाभारा दिव्य तेजाने उजळून निघाला. जगात किती तरी काम आहे ते मी करू शकतो... अनाथ आश्रमात मी सेवा देवू शकतो.
मी विठ्ठलाला हात जोडले. व ठाम निर्धाराने मंदिराच्या बाहेर आलो..
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवळ पांडुरंग 🌾
जय जय राम कृष्ण हरी 🌾🌾🙏🏻🙏🏻🌾

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- एकीचे बळ मिळते फळ

शिवकालीन वजने(मापे)

देवाचा जन्म कसा झाला.

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◾कविता :- नवरा माझा

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...