नशीब म्हणजे काय असते ?
न शीब ! आपण आपला भार ईश्वरावर सोपवून, शांत बसून राहावे.’ आपल्या आयुष्यात काय घडणार वा काय घडणार नाही, हे आधी ठरविणारी कुठलीही गूढ शक्ती अस्तित्वात नाही. त्यामुळे ललाटलेख लिहिण्याचा, त्यात कुणी काही बदल करण्याच्या वगैरे काहीच शक्यता अस्तित्वात नाहीत. दैव, ललाटलेख, विधिलिखित, नियती, प्रारब्ध, नशीब हे सगळे शब्द जे आपण दैनंदिन जीवनात वारंवार वापरतो ते सर्वसाधारण सारख्याच अर्थाचे शब्द आहेत; व त्यातील समान दैववादी वृत्ती अशी की ‘नशिबात जे असेल ते होईल. आपण आपला भार ईश्वरावर सोपवून, शांत बसून राहावे.’ ही दैववादी वृत्ती, प्रयत्नवादाच्या बरोबर विरुद्ध अशी, मानवी प्रगतीला हानिकारक वृत्ती आहे. यात असे मानतात की ब्रह्मदेवाने (किंवा अल्लाने किंवा सटवाईने) आपले नशीब आपला जन्म होतानाच ठरवून किंवा लिहून ठेवलेले आहे व आपल्या आयुष्यात सर्व काही त्याबरहुकूम घडणार आहे. नाहीतरी आजूबाजूच्या परिस्थितीवर आपले नियंत्रण नसतेच; आणि सर्व काही दैव-नियंत्रित मानल्यामुळे, मानवी प्रयत्नांना काही महत्त्वच उरत नाही. हे घातक नाही का? तरीही जगभर सगळीकडेच, सर्व लोकांमध्ये, अशी दैवाधीनता कमी-अ...