अशा पद्धतीने बोटांचं काळवंडलेपण करा दूर
👉 हातांची बोटे स्वच्छ, आरोग्यदायी असतील तेव्हाच हाताचं सौंदर्य खुलून दिसेल. ती निस्तेज, काळवंडलेली असली तर तुम्ही कितीही महागड्या अंगठ्या बोटात चढवल्या तरी त्या फिक्या पडतील. कसं दूर करायचं बोटांचं काळवंडलंपण...पाहूया ▪ *बदामाचं तेल* : रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाचे काही थेंब गुलाबपाण्यात मिसळून त्या मिश्रणाने दोन्ही हाताच्या बोटांना मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने हात धुवा. आठवड्यातून किमान दोन वेळा हे नक्की करा. ▪ *लिंबू आणि मध* : लिंबाने त्वचा उजळते. त्यामुळे लिंबाच्या रसात मध मिसळून बोटांना लावल्यास त्यांचं रापलेपण दूर होतं. त्वचा मुलायमही होते. ▪ *बेकिंग सोडा* : एक चमचा बेकिंग सोडा गरम पाण्यात मिसळा. या पाण्यात हात 15 मिनिटे बुडवून ठेवा. त्यानंतर हात थंड पाण्याचे धुवा. हा उपाय आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा करा. ▪ *बेसन* : अर्धा चमचा बेसनात एक चमचा पाणी मिसळा. ही पेस्ट बोटांवर मळा. 15 मिनिटं हे मिश्रण तसंच सुकू द्या. नंतर ते चोळून स्वच्छ करा. त्यानंतर हात गरम पाण्याचे धुवा. हा उपाय आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा करा. ▪ *टोमॅटो आणि लिंबू* : त्वचा चमकदार करण्या...