अशा पद्धतीने बोटांचं काळवंडलेपण करा दूर



👉 हातांची बोटे स्वच्छ, आरोग्यदायी असतील तेव्हाच हाताचं सौंदर्य खुलून दिसेल. ती निस्तेज, काळवंडलेली असली तर तुम्ही कितीही महागड्या अंगठ्या बोटात चढवल्या तरी त्या फिक्या पडतील. कसं दूर करायचं बोटांचं काळवंडलंपण...पाहूया

▪ *​बदामाचं तेल* : रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाचे काही थेंब गुलाबपाण्यात मिसळून त्या मिश्रणाने दोन्ही हाताच्या बोटांना मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने हात धुवा. आठवड्यातून किमान दोन वेळा हे नक्की करा.

▪ *​लिंबू आणि मध* : लिंबाने त्वचा उजळते. त्यामुळे लिंबाच्या रसात मध मिसळून बोटांना लावल्यास त्यांचं रापलेपण दूर होतं. त्वचा मुलायमही होते.

▪ *​बेकिंग सोडा* : एक चमचा बेकिंग सोडा गरम पाण्यात मिसळा. या पाण्यात हात 15 मिनिटे बुडवून ठेवा. त्यानंतर हात थंड पाण्याचे धुवा. हा उपाय आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा करा.

▪ *बेसन* : अर्धा चमचा बेसनात एक चमचा पाणी मिसळा. ही पेस्ट बोटांवर मळा. 15 मिनिटं हे मिश्रण तसंच सुकू द्या. नंतर ते चोळून स्वच्छ करा. त्यानंतर हात गरम पाण्याचे धुवा. हा उपाय आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा करा.

▪ *​टोमॅटो आणि लिंबू* : त्वचा चमकदार करण्यासाठी टोमॅटो आणि लिंबाची खूप मदत होते. यातील ब्लिचिंग तत्वांमुळे त्वचा उजळते. तुम्ही रोज बोटांना टोमॅटो किंवा लिंबाच्या तुकड्याने मसाज करू शकता.

▪ *दूध क्रीम* : दुधातल्या लॅक्टिक अॅसिडमुळे मृत त्वचा निघून जाते. दुधाच्या मलईत व्हिटामिन ई कॅप्सूल मिसळून ते मिश्रण हातांवर लावा. पाच मिनिटे ठेवून मग धुवून टाका. यामुळे कोरडी त्वचा मुलायम होते.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !