देव आणि कर्म - बोधकथा
आमच्या गल्लीत एक पानवाला आहे. त्याच्याकडे पाहिले कि असे वाटते कि तो आपलीच वाट पहतो. त्याच्याकडे जो पण ग्राहक गेला कि तो त्याच्याशी गप्पा गोष्टी व चर्चा करत असतो. त्यात त्याला फार आनंद व समाधान वाटत असते. पान बनवतांना त्याचा बरा वेळ जायचा. मी फार वैतागायचो. एक दिवस मी ठरवले याला फार चर्चा करायची हौस आहे का? आज त्याला असा प्रश्न विचारतो कि त्याने परत चर्चा बंद केली पाहीजे. मी त्याच्या दुकानावर गेलो व त्याला विचारले कि बाबा रे! मला एक प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर देवू शकतो का? तो म्हणाला तुम्ही खुशाल विचारा मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. मी विचारले कि माणुुस मेहनत करतो मग त्याला यश मिळाले कि तो म्हणतो हे देवाने यश पदरात टाकले. मला सांग दैव श्रेष्ठ कि मेहनत? मला वाटले कि याची पुरती बोलती बंद होणार, पण त्याने जे उत्तर दिले ते एकुन मी अवाक झालो. बोलती बंद त्याची नाही तर माझीच बोलती बंद झाली. त्याने उत्...