Posts

Showing posts with the label आजारी घोडा

◼️ बोधकथा :- केलं पुण्य घडले पाप

Image
एकदा एका शेतकऱ्याचा घोडा आजारी पडला. ईलाज करण्यासाठी डाॅक्टरला बोलावलं. त्याची व्यवस्थित तपासणी करून डाॅक्टर म्हणाले "तुमच्या घोड्याला गंभीर आजार आहे. आपण तीन दिवस त्याला औषध देऊन पाहू.... ठिक झाला तर ठिक.... अन्यथा आपल्याला त्याला विषारी इंजेक्शन देऊन मारावं लागेल. कारण हा आजार तुमच्या दुसऱ्या प्राण्यांना होऊ शकतो." हे सर्व शेजारी असलेला बकरा ऐकत असतो. डाॅक्टर त्याला औषध देतो अन् निघून जातो , तसा बकरा त्याच्याजवळ जातो व म्हणतो "उठ मित्रा, जरा हालचाल करण्याचा प्रयत्न कर नाहीतर हे लोक तुला मारतील." दुसऱ्या दिवशी पुन्हा डाॅक्टर घोड्याला औषध पाजून निघून जातो. डाॅक्टर गेल्यावर बकरा घोड्याजवळ येतो अन् म्हणतो "मित्रा, धीर धर, हवं तर मी तुला मदत करतो जरा उभं राहण्याचा प्रयत्न कर.चल उठ".पण घोडा तसाच पडलेला.. तिसऱ्या दिवशी डाॅक्टर शेतकऱ्यांला म्हणाला "नाईलाज आहे पण आता याला मारावं लागले. याचे शरीर औषधालाही साथ देत नाही." जेव्हा डाॅक्टर निघून गेला तेंव्हा बकरा घोड्याला म्हणाला "मित्रा, आता तुझ्यावर करा किंवा मरा अशी वेळ आलीय. जर आज तू काह...