म्हातारी आजी - बोधकथा
एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरीता एका दारात उभा राहीला , ''ॐभवती भिक्षांदेहि " अशी गर्जना केली. घरात एकटीच म्हातारी होती, ती म्हणाली, "महाराज ! मी एकटीच आहे, घरात आमटी भात तयार आहे, चार घरात भिक्षा मागण्या पेक्षा आज इथेच जेवा." ब्राह्मण "हो" म्हणाला ब्राम्हणाचे पोटभर जेवण झाले ब्राम्हणाने ताक मागीतले. *भोजनांते तक्रं पिबेत* अस म्हणतात. नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हते. ती म्हणाली, "थांबा महाराज मी आत्ता शेजारणी कडून ताक घेवुन येते." तिने शेजारणीला ताक मागीतले , शेजारणीने भांडभर ताक दिले, आजीने ब्राम्हणाच्या भातावर ताक घातले , ब्राम्हणाने भुरका मारला तो शेवटचाच. ब्राह्मण तडकाफडकी मेला. चित्रगुप्त आणि यमधर्माला प्रश्न पडला की, या कर्माचा भागीदार कोण? कारण ब्राम्हणाने आत्महत्या केली नव्हती. म्हातारीने अतिथीधर्म पाळला होता तिने ब्राम्हणाला मारले नव्हते,दारात आलेल्या अतिथ्याला पोटभर जेवण दिले होते. शेजारणीने शेजारधर्म पाळला होता कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते. आणि ताक पिवुन ब्राह्मण मेला होता...