चाणक्यांची जीवनाविषयी महत्वाची सूत्र
_जीवनात अशी किती तरी वळणे येतात, जिथे आपल्याला दुसऱ्याच्या सल्ल्याची गरज भासते, म्हणून आज आम्ही तुम्हाला चाणक्य यांनी सांगीतलेली काही अशी सूत्रे सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या जीवनात त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल._ 🤷♂कोणत्याही व्यक्तीने गरजेपेक्षा जास्त प्रामाणिक राहू नये. कारण सरळ असलेली झाडेच खूप कापली जातात, त्याचप्रमाणे जास्त प्रामाणिक व्यक्तीलाच जास्त कष्ट सोसावे लागतात. 🤷♂चाणक्य मानायचे की जर आपल्याला काही आर्थिक नुकसान झाले, तर तसं चुकूनही कोणाला सांगू नये. कारण कोणीही तुमचे आर्थिक नुकसान ऐकल्यावर तुमची मदत करणार नाही, उलट तुम्हाला मदत करावी लागेल म्हणून तिथून पळ काढतील. 🤷♂आपल्याला भूतकाळात घडलेल्या घटनेविषयी पश्चाताप नसावा आणि भविष्याविषयी चिंता देखील नसावी. बुद्धिवादी मनुष्य नेहमी वर्तमानात जगतात. 🤷♂पुरुषाचे ज्ञान आणि महिलांचे सौंदर्य ही जगातील सर्वात मोठी ताकद आहे. 🤷♂प्रत्येक मैत्री मागे काही ना काही स्वार्थ असतोच. जगात अशी कोणतीच मैत्री नाही जिच्या मागे लोकांचे स्वता:चे हित नसेल, हे एक कटू सत्य आहे. 🤷♂मुलांवर त्यांच्य...