चाणक्यांची जीवनाविषयी महत्वाची सूत्र

 
_जीवनात अशी किती तरी वळणे येतात, जिथे आपल्याला दुसऱ्याच्या सल्ल्याची गरज भासते, म्हणून आज आम्ही तुम्हाला चाणक्य यांनी सांगीतलेली काही अशी सूत्रे सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या जीवनात त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल._ 

🤷‍♂कोणत्याही व्यक्तीने गरजेपेक्षा जास्त प्रामाणिक राहू नये. कारण सरळ असलेली झाडेच खूप कापली जातात, त्याचप्रमाणे जास्त प्रामाणिक व्यक्तीलाच जास्त कष्ट सोसावे लागतात. 

🤷‍♂चाणक्य मानायचे की जर आपल्याला काही आर्थिक नुकसान झाले, तर तसं चुकूनही कोणाला सांगू नये. कारण कोणीही तुमचे आर्थिक नुकसान ऐकल्यावर तुमची मदत करणार नाही, उलट तुम्हाला मदत करावी लागेल म्हणून तिथून पळ काढतील. 

🤷‍♂आपल्याला भूतकाळात घडलेल्या घटनेविषयी पश्चाताप नसावा आणि भविष्याविषयी चिंता देखील नसावी. बुद्धिवादी मनुष्य नेहमी वर्तमानात जगतात. 

🤷‍♂पुरुषाचे ज्ञान आणि महिलांचे सौंदर्य ही जगातील सर्वात मोठी ताकद आहे. 

🤷‍♂प्रत्येक मैत्री मागे काही ना काही स्वार्थ असतोच. जगात अशी कोणतीच मैत्री नाही जिच्या मागे लोकांचे स्वता:चे हित नसेल, हे एक कटू सत्य आहे. 

🤷‍♂मुलांवर त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत प्रेम करावे, नंतर दहा वर्षापर्यंत शिक्षा करावी, आणि जेव्हा ते सोळा वर्षांचे होतील तेव्हा त्यांचे चांगले मित्र बनावे. 

🤷‍♂भीती हि आपली सगळ्यात मोठी शत्रू आहे. 

🤷‍♂ज्ञान आपला सर्वात चांगला मित्र आहे. एका शिकलेल्या व्यक्तीला सगळीकडेच सन्मान मिळतो. शिक्षण हे नेहमीच सौंदर्य आणि तरुणाईचा पराभव करते. 

🤷‍♂फुलांचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेने जातो, पण एका चांगल्या माणसाचा चांगुलपणा सर्वत्र पसरतो. 

🤷‍♂असंभव शब्दाचा प्रयोग तर भित्रे करतात, बुद्धिमान आणि धीट माणसे स्वता:चा रस्ता स्वतः तयार करतात. 

🤷‍♂आपल्यापेक्षा उच्च किंवा कनिष्ठ दर्जाच्या व्यक्तीशी कधीही संगत करू नये, ते तुमच्या दुःखाचे कारण ठरू शकतात, नेहमी आपल्या बरोबरच्या व्यक्तीशीच संगत करावी. 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...