◾ललित लेख :- स्ञी

   आज स्त्रियांचा जन्मच मुळात नाकारतला जातो. पण स्त्रीयांमुळेच कुटुंबाचा वंशाचा वारसा पुढे-पुढे चालत राहतो हे समाज सोयिस्करपणे आज विसरला आहे. एक स्त्रीच पुर्ण कुटुंबाला शिक्षित करु शकते. आई बनुन, एका वटवुक्षाच्या सावलीप्रमाणे कुटुंबाचा मानसिक आधार बनुन.

     ऐतिहासिक काळापासून आईचं महत्त्व सर्वपरिचित आहे. महाराष्ट्राचे लढवय्या राज्यकते शुरवीर शिवाजी महाराजांची आई जिजाऊबाई ह्या शिस्तप्रिय आई म्हणून ओळखल्या जात. त्यांच्या ह्या शिस्तप्रियतेचा फार मोठा वाटा शिवाजी महाराजांच्या यशात आहे. तसेच साने गुरजींच्या कथेतील शामची आई तिच्याविषयी कितीही लिहिले तरी शब्द अपुरेच पडतील. ती तर साक्षात वात्सल्याची मुर्तीच होती. असे इतिहासातील कितीतरी दाखले आपल्याला देता येतील.

     स्त्री ही विविध भावनांनी नटलेली आहे. दैवानं मातुत्वाचं दान तिच्या पदरात टाकून तिचं श्रेष्ठत्व सिद्ध केल़ं आहे. तिच्या मनात वात्सल्याची भावना  निर्माण केली.स्त्रीच्या या विविध भावनांच्या शुंगारानं स्त्रीचं सौदर्य आधिकच खुलून दिसतं.

     आई या शब्दात मुळातच आप आणि ईश्वर म्हणजे संपूर्ण जग सामावलेल आहे. संस्काराची पहिली पायरी ही आईचं बोट धरून चढता येते. आई जगात आपल्याला चांगल्या-वाईट गोष्टींचा फरक करायचा कसा हे शिकवते. मुळातच आई संस्काराचं विद्यापीठ असते असं म्हटलंतर वावगं ठरू नये. दगडात देव असतो हे आईच सांगते. म्हणूनच त्या दगडाला पुजतो. आपल्या सारख्या दगडरुपी मनाला आकार देण्याचं काम सस्काराच्या माध्यमातून आईच करत असते. म्हणून माणूस आज शिक्षणानं कितीही पुढे गेला असला तरी आई पुढे तो थिटाच असतो, अधुराच असतो. म्हणूनच "आप अन् ईश्वराची महती तुच गं आई, तुझविण अधुरे गं सारे काही," असे म्हणणं काही वावगं ठरणार नाही. आई तिच्या अश्रुंच्या आड स्वताचे दुख लपवुन आपल्या मूलाचे सुख वेचत असत

मंगेश शिवलाल बरंई.

       पंचवटी, नाशिक ४२२००३.


..


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...