Posts

Showing posts with the label मुलांना वाया जाऊ द्यायचे नाही ना..

मुलांना वाया जाऊ द्यायचे नाही ना..

Image
*मग दोन मिनिटे वेळ काढून वाचाचं.. शेजारच्या दोन घरांमध्ये दोघे राहत होते. एका घरामध्ये एक आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये अति श्रीमंत डॉक्टर ! घरच्या अंगणात शोभेची झाडं दोघांनी लावली होती. डॉक्टर आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत. हळूहळू दोघांकडे असलेली झाडे वाढत होती. मात्र डॉक्टर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं मात्र टुमदार, छान असली तरी अंग धरून होती. एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी बागेचं नेमकं काय घडलय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून डॉक्टरला धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती. डॉक्टर विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून डॉक्टरने आजोबांना याचे कारण विचारले. त्या आजोबांचे उत्तर डोळ्यात अंजन घालणारे होते !! आजोबा म्हणाले “तुम्ही झाडांना लागणाऱ्या सर्व ...