मुलांना वाया जाऊ द्यायचे नाही ना..


*मग दोन मिनिटे वेळ काढून वाचाचं..

शेजारच्या दोन घरांमध्ये दोघे राहत होते. एका घरामध्ये एक आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये अति श्रीमंत डॉक्टर ! घरच्या अंगणात शोभेची झाडं दोघांनी लावली होती. डॉक्टर आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत.

हळूहळू दोघांकडे असलेली झाडे वाढत होती. मात्र डॉक्टर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं मात्र टुमदार, छान असली तरी अंग धरून होती.

एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी बागेचं नेमकं काय घडलय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून डॉक्टरला धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती. डॉक्टर विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून डॉक्टरने आजोबांना याचे कारण विचारले.

त्या आजोबांचे उत्तर डोळ्यात अंजन घालणारे होते !!

आजोबा म्हणाले “तुम्ही झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गरजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. तुमच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाड मस्त उभी आहेत.”

*Note :* आपल्या मुलांच्या बाबतीतही असेच असते.. जितके जास्त जपाल,जितक्या जास्त सुविधा द्याल,तितके मुलांना कमकुवत कराल. निसर्गाने प्रत्येकाला लढण्याची शक्ती दिलेली असते. ती खच्ची करू नका. उलट थोडेफार ऊन वारा पाऊस त्याला सोसू द्या ! तरच तो मजबूत बनेल. मग जीवनात कितीही वादळे आली तरी तो पालकांच्या (खत पाण्यावर) म्हणजेच भरोशावर जगणार नाही !

हेच खरे पालकत्व आहे !!!!

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !