महात्मा गांधींची पूर्ण जीवनी
आपण या लेखात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रज सरकारच्या विरूद्ध आपले अहिंसावादी या शास्त्राचा वापर करून त्यांना वठणीवर आणणारे महान क्रांतिकारक महात्मा गांधी यांच्या बद्दल आणि त्यांनी केलेल्या बहुमूल्य कामगिरी बद्दल आपण जाणून घेणार आहोत. कुठल्याही प्रकारची शरीर प्रकृती नसताना केवळ अहिंसेच्या बळावर त्यांनी कश्याप्रकारे इंग्रज शासनाला आपल्या देशातून परतून लावले. तसचं, त्यांनी केलेली देशांतील सामाजिक सुधारणा, अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी केलेली महत्वपूर्ण कामगिरी. त्याचप्रकारे त्यांनी घडवून आणलेली हिंदू-मुस्लीम एकजूट अश्या प्रकारच्या अनेक बाबी आपण या लेखाच्या मध्यमातून जाणून घेणार आहोत. देशाच्या स्वातंत्र्यकालीन इतिहासातील महानक्रांतिकारक, शांतता व अहिंसेचे पुजारक महात्मा गांधी यांचा जन्म सन २ ऑक्टोबर १८६९ साली गुजरात मधील पोरबंदर या शहरात झाला होता. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते परंतु, लोक प्रेमाने त्यांना बापू म्हणत असतं. रवींद्रनाथ टागोर यांनी बापूना सर्वप्रथम “महात्मा” ही उपाधी धारण केली होती. तसचं, सन १९४४ साली सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी य...