जिवन विचार - 128
*एखाद्या विषयावर मन एकाग्र केल्यानंतर तेथून ते इच्छेनुसार काढता न येणे हेच आपल्या बहुतेक सर्व दुःखाचे कारण असते.मुलांमध्ये मन एकाग्र करण्याची व ते वेगळे करण्याची ह्या दोन्ही शक्ति बरोबरच वाढविल्या पाहिजे.* *मनुष्य व पशू यांच्यातील भेद आहे एकाग्रतेचा.मनुष्याच्या ठिकाणी एकाग्रतेची शक्ती पशूहून अधिक असते.मनुष्या मनुष्यातील भेद देखील त्यांच्यातील एकाग्रतेचा शक्तीतील भेदामुळे होतो.निकृष्ट मनुष्याची श्रेष्ठ मनुष्याशी सोबत तुलना करून पहा.त्यांच्यातील भेद एकाग्रतेचा शक्तीतील प्रमाणात आहे .त्यांच्यात हाच काय तो भेद आहे.* 📚 *स्वामी विवेकानंद*🙏