Posts

Showing posts with the label 🥔 बटाटे फ्रीजमध्ये ठेवू नका! / आरोग्य

🥔 बटाटे फ्रीजमध्ये ठेवू नका! / आरोग्य

👉 बटाटे खराब होऊ नयेत म्हणून फ्रीजमध्ये ठेवले जातात. मात्र, ही कृती आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. 👉 बटाट्यातल्या स्टार्चचे रुपांतर साखरेत होते. हीच साखर आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरते. 👉 फ्रीजमधील बटाटे खाल्ल्यामुळे कर्करोगासारखी दुर्धर व्याधीही जडू शकते. 👉 बटाट्यातल्या साखरेचा यातल्याच अमिनो अ‍ॅसिड अ‍ॅस्परॅगनशी संपर्क होऊन अ‍ॅक्राइलामाइड नावाचे घातक रसायन तयार होते. हे रसायन आरोग्यासाठी घातक ठरते. 👉 फ्रीजमध्ये ठेवलेले बटाटे शिजवल्यानंतर त्यात अ‍ॅक्राइलामाइड रसायनाची निर्मिती होऊ लागते. हे रसायन पोटात गेल्यानंतर बराच त्रास होऊ शकतो. त्यामुळे बटाटे कोरड्या जागी ठेवायला हवेत. 👉 अ‍ॅक्राइलामाइड हे रसायन स्टार्चयुक्त पदार्थांमध्ये आढळते. उच्च तापमानावर शिजवलेल्या स्टार्चयुक्त पदार्थांमध्ये या रसायनाची निर्मिती होते. हे रसायन कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते.