◾कविता :- सर्वानी झाडे लावूया
जागतिक पर्यावरण दिन , सर्वानी साजरा करुया । सर्वाच्या सुखी जीवनासाठी , जागोजागी झाडे लावूया ॥ निसर्ग आणि पर्यावरण , हाच आमचा खरा मित्र आहे । नैसर्गिक गोष्टींचा वापर करा , महती पर्यावरणाची आहे || स्वच्छता ठेवा गलोगल्लीत , निसर्ग चक्र चालेल सुरळीत । सुरुवात पर्यावरण रक्षणाची , आनंद पसरेल जगभरात ॥ पुढच्या पिढीसाठी करु आसरा , फळांच्या बीया पर्यावरणात पसरा । दारी राही वृक्षांचा पहारा , तेव्हाच पशुपक्षांना देऊ सहारा || उन्हात हवी असेल सावली , तर वृक्ष लावा पावलोपावली । अंगणात लावा वृक्षवेली , हिच आरोग्याची गुरुकिल्ली || पर्यावरणाची केली हानी , तर होते मनुष्य जीवनाची हानी । म्हणून वृक्ष लावा घरोघरी , तेव्हाच पर्यावरण असेल जीवनी ॥ ======================= महेन्द्र सोनेवाने “ यशोमन " गोंदिया दिनांक : ०१/०५/२०२१ ======================= ____________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर ...