◼️ कविता :- दुरावा ... | ✍️ मराठीचे शिलेदार कविता समुह .... | Marathi Poem

➖➖➖➖🍂〰🍂➖➖➖➖

मराठीचे शिलेदार कविता समुह

➖➖➖➖🍂〰🍂➖➖➖➖

‼ 'मराठीचे शिलेदार कविता' समूहात काल देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले 'काव्य लेखन'.‼

➖➖➖➖🍂〰🍂➖➖➖➖


       🙏विषय :- दुरावा 🙏

       🍃दिनांक:-  २१ / १२ /२०२०🍃

💌.....💌.....💌.....💌.....💌.....💌


येणार ना कधी

नात्यात दुरावा

असाच प्रत्येकाने

मनी विचार ठेवावा


स्वार्थामुळेच येई

नात्यात दुरावा

निस्वार्थ गुण

स्वत: अंगिकारावा


नकोच हेवे दावे

वाढती दुरावे

नकोच उने दूने

सारे समजुन घ्यावे


जपता नाते स्नेहाचे

बदलेल सारे क्षणात

सुख समृद्धी नांदेल

आपल्या जीवनात.


अनमोल क्षणांचा

आनंद जीवनी घ्यावा

देऊन मान साऱ्यांना 

आशिर्वाद मिळवावा


*चव्हाण बी.एम.सेलु.परभणी*

*© सदस्य मराठीचे शिलेदार समुह*


💌.....💌.....💌.....💌.....💌.....💌


प्रेमासाठी प्रिये तू

किती केला अट्टाहास

आता तू असा माझा

करू नको ग उपहास


प्रेमविवाह करण्यासाठी

चाललो आपण खडतर वाट

पवित्र आपुल्या नात्याचा तू

करू नको ग नायनाट


सुखी आपुल्या संसारात

कमी जास्त झालं ग काही

तुझ्यावरचं प्रेम मात्र

अजिबात कमी झाल नाही


तुझ्यापासून वेगळं राहणे

सहन होईना हा दुरावा

राग शांत करून तू

माझा थोडा विचार करावा


एकमेकांवर विश्वास ठेवून

दुरावा नात्यातला दूर करू

सुखी आपुला संसार पुन्हा

नव्याने आपण सुरु करू


*सौ. आशा भोसले*

*माणगाव, रायगड*

*©️सदस्या मराठीचे शिलेदार समूह*


💌.....💌.....💌.....💌.....💌.....💌


हृदयी वेदना 

तुझ्या दुराव्याच्या 

हजारो तुकडे 

अंतर मनाच्या 


कातर वेळीस

मन रे उदासे 

खोलवर घाव

कुणा ना दिसे 


सुखद ते क्षण 

निसटुन गेले 

पाहिले ते स्वप्न 

कसे विस्कटले 


कुण्या रे पाप्याची 

नजर लागली 

विखुरले हास्य 

नेत्र पाणावली 


परत ये सख्या 

माझ्या जिवनी रे

श्वासाच्या घटका 

संपण्या पुर्वी रे 


*सौ रुपाली म्हस्के मलोडे गडचिरोली*

 *©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*


💌.....💌.....💌.....💌.....💌.....💌


तुझ्या दुराव्यातील क्षण

‌नकोच असतात मला... 

कधी संपेल हा दुरावा, 

कधी येशील का जवळ  जरा?                    


आठवणींनी पाणावलेल्या डोळ्यांना

 इतरांपासुन लपून कसे? 

भरभरुन वाहणाऱ्या अश्रुंना

थोपावून खोटे हसू आणायचे तरी कसे ? 


ते अश्रु लपवण्याच्या प्रयत्नांत, 

 मग मी तुलाच दोष देत राहते ... 

आणि या खोट्या प्रयत्नांत

तुला आणखीनच आठवत राहते...

तुला आणखीनच आठवत राहते...


 *कु.पुजा छत्रपाल नंदागवळी* 

 *मु.मालकनपुर गोंदिया* 

 *©सदस्या मराठीचे शिलेदार समुह.*


💌.....💌.....💌.....💌.....💌.....💌


तुझ्या माझ्या मैत्रीला

        गणित समजते

तुझ्या माझ्या प्रेमाला

       बेरीज समजते

ढाळलीस जरी अश्रू

      तर वजाबाकी होते

झुरते तू माझ्यासाठी

      मी झुरते तुझ्यासाठी

ह्याला आपल्या मैत्रीचा

      गुणाकार समजते

मैत्रीत आला दुरावा

      जरी दूर गेलीस तू

ह्याला आपल्या मैत्रीचा

     भागाकार समजते

भागाकारला निःशेष

     भाग दिला असता

आठवण बाकी राहते

     ह्या गणिताचं उत्तर

केवळ प्रेमच येते

       केवळ प्रेमच येते


*मनीषा ब्राम्हणकर*

*अर्जुनी/मोरगाव,गोंदिया*

*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*


💌.....💌.....💌.....💌.....💌.....💌


दुरावा निर्माण होईल

  अशी स्वार्थी वृत्ती नको..


भावभावाचा वैरी होईल

      अशी दुर्बुद्धी देवू नको...


बुद्धी गहाण टाकणारी

     लालसावृत्ती कधी नको...


मायबाप वृद्धाश्रमात धाडी

    अशी औलाद कदापि नको..


सत्तेसाठी खुर्ची  जिंकणारा

     नेता देशाला कधीच नको..


सर्वांगीण विकास नसणारी

    शिक्षणपद्धती अमलात नको...


काव्यचोरी करून प्रसिद्धी

     साहित्यिक नकोच नको...


*सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे बीड*  

 *कवयित्री/लेखिका/सदस्या* 

 *©मराठीचे शिलेदार समूह*

 

💌.....💌.....💌.....💌.....💌.....💌


मुके झाले शब्द....

अबोल झाल्या भावना 

न बोलता कळेल का रे 

तुला माझ्या संवेदना  ||


या माणसांच्या गर्दीत 

कुठे शोधू तुला....?

हरवलास तू या गर्दीत 

याची जाण नाही आहे तुला  ||


अजूनही तुला का कळेना...?

वाढलायं आपल्यातला दुरावा 

तुझाच मुक्या शब्दांनी केलंय 

तुला आपल्या माणसांपासूनच परका ||


या मुक्या शब्दांना आता तरी

बोलके करून सोड ना 

या दुरावलेल्या मनांना 

पुन्हा एकदा आपुलकीने जोड ना ||


*सोनल प्रदीप शास्त्रकार*

   *चंद्रपूर* 

*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*


💌.....💌.....💌.....💌.....💌.....💌


किती रे हा आता दुरावा

गेलास परदेशी मला सोडूनी

ये ना झडकरी आपल्या घराला

ये लवकर मायदेशी परतुनी.......


काय सांगू तुला सख्या रे 

सोंग किती आणायचे आता

तुझ्या प्रेमासाठी राती सार्‍या

काढल्या जागूनी नाही या बाता....


आश्रूयेतात नित्य नयनातुनी

परी ना दविले मी कधी कोणा

आता रे निघुनी माझ्यासाठी तू

समजावतेय रोजच  माझ्या मना....


क्षण क्षण मी रोजच मरतेय

तुझ्या आठवात रे सजणा

दे दिलासा मला आता तरी

माझ्याकडे जरासा तू पाहा ना....


ओढ लागली नयना सख्या

दुरावा काही सहन होत नाही

जरा मायदेशी लवकर येण्याचे 

सख्या रे तू खरच आता पाही...


*वसुधा नाईक,पुणे*

*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*


💌.....💌.....💌.....💌.....💌.....💌


सावर रे मना तू आता

नकोच लागू झुरणी

येणार ना कधीही आता

उडून गेलेली चिमणी


आठवानि तिच्या रे

होतोस तू घायाळ

थांबती न आसवे नयनी

वाहती रे खळखळ


लावूनी चटका जीवाला

गेली भुर्ररकून उडुनी

चिमुकली चिमणी पाखरे 

घरट्यात पोरकी करूनी


होती लाडकी सकलांची

जसा खळखळणारा निर्झर

क्रूर पणाने नेले नियतीने

का न फुटला पाझर


गेली अशी दूर निघूनी

होईना दुरावा सहन

आठवांनी तुझ्या लाडके

आक्रोश करी मन


शोधती अजून नयन

वाटते आशा माझ्या मना

येईल का चिमणी परतून

घेईल का जन्म पुन्हा


*सौ संगीता म्हस्के पुणे*

*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*


💌.....💌.....💌.....💌.....💌.....💌


 माणुसकी आहे तुजपाशी

आचरणात चुकलाशी.....

लाभ मिळवण्या साठी

दैवते का धुंडाळाशी ......


अंतरी तुझ्या भेदभाव

निवांत शुद्ध कर चित्त

विटाळ तुला माणुसकीचा

शोध जाणीव होऊन भक्त


किती तुझे सोवळेपन

परधन ,परनारी पापाय 

खोटे ते तुझे साधुपन ...

तुझ्यातली आसुरी जग पहाय


नाही तुझ्याकडे दया माया

कशी नांदेल हृदयात शांती

चांगल्या कर्माचा दुरावा....

कशी वसेल देवाची वस्ती 


*सिंधू बनसोडे ,इंदापूर ,जि -पुणे*

*©सदस्या -मराठीचे शिलेदार समूह*


➖➖➖➖🍂〰🍂➖➖➖➖

*🙏मुख्य परीक्षक/संकलक/ सहप्रशासक*🙏

          *✍सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर*

                   *तुकूम, जि.चंद्रपूर*

 *©मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*

➖➖➖➖🍂〰🍂➖➖➖➖

*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*

➖➖➖➖🍂〰🍂➖➖➖➖





Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...