श्रध्दा - बोधकथा
हॉस्पिटलच्या ऑपरेशन वॉर्ड समोर एका बाईच्या येरझारा चालू होत्या. ऑपरेशन रूममधून डॉक्टर बाहेर पडताच तिचं मन अगदी सैरभैर झालं. डॉक्टर आता काय सांगणार? माझ्या मुलाला काय झालंय? तो बरा होईल नं? बाहेर येताच तिने त्या ज्युनियर डॉक्टरांना थांबवून विचारले. डॉक्टरलाही वस्तुस्तिथी लपवता आली नाही. आलेले शब्द बाहेर पडू नये म्हणून त्याचा आटापिटा चालू होता पण सत्य परिस्थिती सांगावीच लागणार होती. हृदयातील गुंतागुंतीमुळे लहानग्याचा जीव टांगणीला लागला होता. आता काही दिवस, आठवडे हाताशी आहेत असं सांगताना त्याने पुसटसा प्रकाश दाखवला, तो म्हणजे शहरातील ह्या गुंतागुंतीवर शस्त्रक्रिया करण्यात प्रख्यात असणाऱ्या डॉक्टरांना दाखवणे. ज्युनियर डॉक्टरांनी तिच्या मुलासाठी स्वतःचं वजन वापरून मोठ्या डॉक्टरांशी सल्लामसलत केली. केसची गुंतागुंत बघून त्या डॉक्टरांनी ही केस हातात घ्यायचं आश्वासन दिलं. ओपन हार्ट शस्त्रक्रिया करावी लागणार होती. ऑपरेशन रूमच्या बाहेर त्या माउलीचं मन काही शांत बसत नव्हतं. सतत तेच विचार... आपल बाळ परत चांगलं होईल नं? आत जाणाऱ्या त्या प्रख्यात डॉक्टरांना तिने थांबवून हाच प्रश्न केला. तेव्हा डॉक्ट...