श्रध्दा - बोधकथा

हॉस्पिटलच्या ऑपरेशन वॉर्ड समोर एका बाईच्या येरझारा चालू होत्या. ऑपरेशन रूममधून डॉक्टर बाहेर पडताच तिचं मन अगदी सैरभैर झालं. डॉक्टर आता काय सांगणार?
माझ्या मुलाला काय झालंय?
तो बरा होईल नं?

बाहेर येताच तिने त्या ज्युनियर डॉक्टरांना थांबवून विचारले. डॉक्टरलाही वस्तुस्तिथी लपवता आली नाही. आलेले शब्द बाहेर पडू नये म्हणून त्याचा आटापिटा चालू होता पण सत्य परिस्थिती सांगावीच लागणार होती.

हृदयातील गुंतागुंतीमुळे लहानग्याचा जीव टांगणीला लागला होता. आता काही दिवस, आठवडे हाताशी आहेत असं सांगताना त्याने पुसटसा प्रकाश दाखवला, तो म्हणजे शहरातील ह्या गुंतागुंतीवर शस्त्रक्रिया करण्यात प्रख्यात असणाऱ्या डॉक्टरांना दाखवणे.

ज्युनियर डॉक्टरांनी तिच्या मुलासाठी स्वतःचं वजन वापरून मोठ्या डॉक्टरांशी सल्लामसलत केली. केसची गुंतागुंत बघून त्या डॉक्टरांनी ही केस हातात घ्यायचं आश्वासन दिलं.

ओपन हार्ट शस्त्रक्रिया करावी लागणार होती. ऑपरेशन रूमच्या बाहेर त्या माउलीचं मन काही शांत बसत नव्हतं. सतत तेच विचार... आपल बाळ परत चांगलं होईल नं?

आत जाणाऱ्या त्या प्रख्यात डॉक्टरांना तिने थांबवून हाच प्रश्न केला. तेव्हा डॉक्टरांकडेही 'आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करू' ह्या शिवाय काहीच उत्तर नव्हतं.

गुंगीचं औषध देण्याअगोदर त्या लहानग्याला डॉक्टर म्हणाले, “पठ्ठ्या, घाबरू नकोस. आता हे ऑपरेशन झालं की तू एकदम बरा होशील!”

वास्तविक ऑपरेशनमधील यशाची हमी अगदी धूसर होती. पण डॉक्टरांनाही काय सांगावं काहीच कळत नव्हते.

डॉक्टर हे बोलताच मुलाचा प्रश्न, "डॉक्टर मी बरा होईनच. पण माझी एक सूचना आहे, *माझ हृदय तुम्ही उघडणार तेव्हा एक काळजी घ्या की माझ्या हृदयात देव आहे त्याला धक्का नको बसायला.* माझी आई सांगते देव माझ्या हृदयात आहे!”

मुलाचं हे बोलणं ऐकून डॉक्टरांनाही अश्रू आवरले नाहीत. शस्त्रक्रियेच्या वेळी आपला अवघा अनुभव पणाला लावूनही हृदयातील रक्तस्त्राव थांबत नव्हता. शेवटी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला.

आता काही मिनिटे आणि एक जीव निघून जाईल ह्या विचारात डॉक्टर असताना अचानक नर्सने र
*रक्तस्त्राव थांबला* अशी सूचना दिली. त्या नंतर पुन्हा एकदा शस्त्रक्रियेला सुरूवात करून डॉक्टरांनी ती यशस्वी केली.

मुलगा शुद्धीवर आल्यावर त्याचा पहिला प्रश्न ह्याच डॉक्टरांना होता, *"डॉक्टर तुम्ही देवाला पाहिलं नं, तो कसा दिसत होता?"*

त्याच्या ह्या प्रश्नावर डॉक्टर निरुत्तर झाले. आपल्या अनुभवानेसुद्धा *रक्तस्त्राव कसा थांबला अचानक* ह्याचं उत्तर त्यांना मिळत नव्हते. जिकडे विज्ञानाची कास धरणारा एक डॉक्टर एका माउलीच्या श्रद्धेपुढे हरला होता. त्याच क्षणी डॉक्टर स्वतःला सावरून म्हणाले,

*"तो नं ह्याच माउलीसारखा होता...!"*

विज्ञान जिकडे तोकडे पडते, तिथे सुरूवातीस काही प्रश्नाची उत्तरं आपण त्याच्यावर सोडतो. त्याला काही नाव द्या.... देव, डॉक्टर, मसीहा, एंजल, गुरु किंवा अजून काही.

*जी काही असते ती *श्रद्धा!*

*कोणती तरी एक शक्ती माझ्या आकलनाच्या पलीकडे कार्यरत आहे, ती सगळं समजून घेईल आणि सगळं सुरळीत होईल.*

*जीवन- मरणाचा प्रश्न असो वा आयुष्यातील कठीण निर्णयांचा आपल्यातील एक श्रद्धेचा भाग खूप मोठा न दिसणारा रोल करत असतो. ज्याची उत्तर कोणत्याही विज्ञान किंवा गणिताने देता येत नाही.*

*आस्तिक असो वा नास्तिक पण ती श्रद्धा जर मनापासून असेल तर नक्कीच उत्तरं मिळतात.*   

*आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की जिकडे काहीच सुचत नाही. पुढचं काहीच दिसत नाही. मागे जावं तर काहीच सापडत नाही. अश्या वेळी आपण तुटतो. डळमळीत होतो. कधी कधी तर कोसळतो. पण श्रद्धेवर विश्वास असेल तर अश्या गोष्टीतून तारून जाता येते.*

*आपल्याच मनासारखं होईल असं नाही. पण जे समोर येईल त्याला सामोरी जायची शक्ती श्रद्धेतून मिळते. ती कमी- जास्त असेलही पण ती मिळते हे मात्र नक्की.*

*कोणत्याही हॉस्पिटलच्या दरवाज्याशी बसवलेला गणपती हा दगडाचा असो वा फोटोचा, कातळाचा असो वा संगमवराचा. तो सगळ्यांना मदत करतो का ते माहित नाही. पण त्याच्यावरील श्रद्धा मात्र त्या कठीण प्रसंगाला तोंड देण्याची सगळ्यांना हिंमत देते ह्यात शंका नाही.*

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾कविता :- नवरा माझा

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾ललित लेख :- स्ञी

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◾विशेष लेख :- प्रतिसृष्टी निर्माण करणारे दोन देवदुत पती पत्नी !