गाडगे बाबा जिवन कार्य - बोधकथा
संत गाडगेबाबा यांची माहिती व कार्य हातात खराटा घेवुन समाजातील लोकांची डोकी साफ करणारे राष्ट्रसंत डेबुजी(गाडगेबाबा) यांच्या पुण्यतिथीला माझे लाख लाख दंडवत. 💐💐💐💐💐💐💐 निष्काम कर्म, समाजसेवा व मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानणारे संत गाडगे महाराज हे आधुनिक संत होते. त्यांनी माणुसकीचा संदेश देत स्वच्छता व मानवतेचा नवा धर्म समाजात रुजवला. समृध्द समाज घडवण्यासाठी, तळागाळातील अंध, अपंग, रोगी, दीन-दलित, दुःखितांचे जीवनमान उंचावण्यासाठी ते आयुष्यभर झगडले. सेवा प्रमुख धर्म हा मूलमंत्र त्यांनी जगाला दिला. आयुष्यभर चिंध्यांचे वस्त्र पांघरणारा, सारे गाव स्वच्छ केल्यावर तळहातावर भाकरी घेऊन खाणारा, मोठमोठ्या धर्मशाळा, वसतिगृहे, आदिवासी आश्रमशाळा, महाविद्यालये बांधूनही आयुष्यभर झोपडीत राहणारा, श्रमाची उपासना करायला सांगणारा, कोट्यवधी रुपयांच्या देणग्या लाभल्या तरी एका पैशाचादेखील मोह न ठेवणारा, आयुष्यभर कीर्तनाद्वारे गोरगरिबांना समुपदेशन करणार्या थोर निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील भुलेश्वरी नदीच्या तीरावरील शेंडगाव येथे २३ ङ्गेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त...