गाडगे बाबा जिवन कार्य - बोधकथा

संत गाडगेबाबा यांची माहिती व कार्य

हातात खराटा घेवुन समाजातील लोकांची डोकी साफ करणारे राष्ट्रसंत डेबुजी(गाडगेबाबा) यांच्या पुण्यतिथीला माझे  लाख लाख दंडवत.
💐💐💐💐💐💐💐
निष्काम कर्म, समाजसेवा व मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानणारे संत गाडगे
महाराज हे आधुनिक संत होते. त्यांनी माणुसकीचा संदेश देत स्वच्छता व
मानवतेचा नवा धर्म समाजात रुजवला. समृध्द समाज घडवण्यासाठी, तळागाळातील
अंध, अपंग, रोगी, दीन-दलित, दुःखितांचे जीवनमान उंचावण्यासाठी ते आयुष्यभर
झगडले. सेवा प्रमुख धर्म हा मूलमंत्र त्यांनी जगाला दिला. आयुष्यभर चिंध्यांचे
वस्त्र पांघरणारा, सारे गाव स्वच्छ केल्यावर तळहातावर भाकरी घेऊन खाणारा, मोठमोठ्या धर्मशाळा, वसतिगृहे, आदिवासी आश्रमशाळा, महाविद्यालये
बांधूनही आयुष्यभर झोपडीत राहणारा, श्रमाची उपासना करायला सांगणारा,
कोट्यवधी रुपयांच्या देणग्या लाभल्या तरी एका पैशाचादेखील मोह न ठेवणारा,
आयुष्यभर कीर्तनाद्वारे गोरगरिबांना समुपदेशन करणार्या थोर निष्काम
कर्मयोगी संत गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील
भुलेश्वरी नदीच्या तीरावरील शेंडगाव येथे २३ ङ्गेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त्यांचे खरे नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर. रंगीत चिंध्या हेच त्यांचे महावस्त्र. गाडगे,
काठी, कानात कवडी आणि पायात दोन प्रकारच्या चपला हे त्यांचे अलंकार. त्यांचे भोजन म्हणजे कांदा, मिरची, भाकरी. बाबांचे कार्य परीट समाजापुरते सीमित न राहता संबंध मानवजातीला नतमस्तक करायला भाग पाडणारे आहे. मानवी मनावर
बसलेल्या अंधश्रध्देच्या भुताचा बीमोड करण्यासाठी गावा-गावात कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधन केले. देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका,
सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवर्षी, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, अशी शिकवण आयुष्यभर
त्यांनी मानव समाजाला दिली. माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यातून रंजल्या-गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात
ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम बांधले. गाडगेबाबांचा शिक्षणाशी संबंध नसताना कार्यकृतीच्या बळावर गावागावाच्या सङ्गाईसोबत तिथे
राहणार्या लोकांच्या मनाची सङ्गाई करुन त्यांनी आपल्या अंगी असलेल्या विद्वत्तेचे सदैव दर्शन दिले. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवातच गाडगेबाबा अधिक रमत. त्यांचे खरे सामर्थ्य कीर्तनात होते. त्यांच्या जिभेवर साक्षात तुकोबांचे अभंग नाचत. बाबांचे कीर्तन अशिक्षितांसाठी होते तसेच
तथाकथित सुशिक्षितांसाठी, दुःखीतांसाठीही होते. हजारो वर्षे समाजाच्या आर्थिक सत्तेखाली आणि धार्मिक रुढीखाली भरडून निघालेल्या दूधखुळ्या,
भोळ्या आणि हीन-दीन समाजांच्या उध्दाराचा धगधगीत प्रकाशझोत म्हणजेच गाडगेबाबांचे कीर्तन. ते ज्या गावात जात त्या गावातले रस्ते पहिल्यांदा खराट्याने
साङ्ग करत. रात्री कीर्तनातून लोकांच्या डोक्यातील घाण साङ्ग करत. एरवी कोणाशी न बोलणारे बाबा कीर्तनासाठी उभे राहिले की, शब्दांचा, साहित्याचा,
सद्विचारांचा असा काही मारा करत की, ऐकणारा मंत्रमुग्ध होत असे. संत गाडगेबाबांनी आपले सारे आयुष्य समाजासाठी खर्ची घातले. त्यांनी महाराष्ट्रात अनेक
ठिकाणी गोरक्षण संस्था व शाळा-कॉलेजेस काढली. अनेक धर्मशाळा बांधून यात्रेकरुंसाठी सोय त्यांनी केली. दुःख, दारिद्य्र, अज्ञान दिसताच तिथे ते धावून जात. त्यांनी देशाला व समाजाला स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाने ते मंत्रमुग्ध करत. अमरावती येथे गाडगेबाबांच्या जन्म-
शताब्दी समारोहात मदर तेरेसा म्हणाल्या होत्या की, परमेश्वराने संत गाडगेबाबांसारख्या व्यक्ती निर्माण करुन मानवतेवर अनंत उपकार केले आहेत, मात्र
मानवतावादी गाडगेबाबांकडे आणि त्यांच्या परखड तत्त्वज्ञानाकडे म्हणावे तसे देशाने, त्यांच्या अनुयायांनी, लोकांनी आणि इतिहासानेही लक्ष दिल्याचे दिसत नाही.
अशा या मानवतावादी युगप्रवर्तक संतांबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ते खरे संत आहेत. इतर बुवांपेक्षा गाडगेबाबांसारखे संत आपल्या देशात अधिक
झाले पाहिजेत. त्यांना तुमच्या धनाची, मानाची पर्वा नाही. त्यंाना समाजपरिवर्तनाचा विचार श्रेष्ठ वाटतो, तेच खरे मानवतावादी संत आहेत. माणसाने
माणसाला कमी लेखावे यासारखा अधर्म नाही. कोंबडे-बकर्या खाणारा देव नसून सैतानच आहे हे बाबांचे मत. गाडगेबाबा म्हणजे मानवतावादी स्वाभिमान शिकवणारे अदभुत संत. भोळ्याभाबड्या लोकांच्या मनातून अंधश्रध्दा दूर करण्याचे महत्त्वाचे कार्यही त्यंनी केले ते म्हणतात, देव देवळात नाही, दगडात नाही, माणसात आहे.
माणसांची पूजा करा. मानवतेची पूजा करा. माणसामधल्या परमेश्वराची पूजा करणार्या या संतांने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात एक प्रचंड सामर्थ्य निर्माण
केले. गाडगेबाबांना विचार करण्याची अङ्गाट दूरदृष्टी होती. आपल्या बुध्दीकौशल्याने निःस्वार्थ निरंतर सेवाभाव ठेवून त्यांनी समाजात प्रत्यक्ष कृतिशील राहून
कार्य करण्यास प्रारंभ केला. एखाद्या गावात प्रवेश करतानाच हातात खराटा घेऊन गाडगेबाबा संपूर्ण गाव स्वच्छ करायचे. संपूर्ण गाव स्वच्छ झाल्याशिवाय ते
भाकरीलाही हात लावत नसत. रात्री गावातील स्त्री-पुरुष, तरुणांना चावडी, मैदानावर एकत्र करत. अंधश्रध्दा, लोकशिक्षण व व्यसनाविषयी समाजात
असलेल्या अनिष्ट रुढी, परंपरा, अंधविश्वास, जातीयता, व्यसनाधिनता, स्वच्छता याविषयी लोकजागृती व समाज प्रबोधन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात पायी भ्रमण करुन सामाजिक प्रबोधनचे महान कार्य आपल्या जीवनात शेवटच्या श्वासापर्यंत केले. ५ मे १९२३ रोजी गाडगेबाबांचा मुक्काम
खारेपाटणा (रत्नागिरी) येथे होता. कीर्तनापूर्वी त्यांना त्यांचा मुलगा गोविंद याच्या निधनाची बातमी कळाली. पुत्रनिधनाने ते स्तब्ध झाले. स्वतःला सावरत
दुःखाची छटा चेहर्यावर न दिसू देता गावातून भाकरी मागत पुन्हा कीर्तनास प्रारंभ केला. समाजाच्या दुःखापुढे माझे दुःख ते काय? असे म्हणत, समाजातील
लाखो घरांचे दुःख दूर करायचे आहे असे सांगत. सन १९०५मध्ये गाडगेबाबांनी ऐन तारुण्यात संसाराचा त्याग केला. पुढे महाराष्ट्रामध्ये गावोगावी, खेड्यापाड्यातून
जनस्थितीची पाहणी केली. बाबांचे शरीर जर्जर झाले. अखेर २० डिसेंबर १९५६ रोजी या महान राष्ट्रसंतांने अखेरचा निरोप घेतला. ते शरीराने जरी साक्षात नसले
तरी त्यांचे अद्वितीय कार्य जगाचे अंतिम सत्य ठरले आहे एवढे मात्र खरे

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !