◾कविता :- रोज सकाळी लवकर उठायचं
*****
रोज सकाळी लवकर उठायचं
छानपैकी आरशात बघून हसायचं
आरसाही आपल्याला बघेलं
तोही मस्तपैकी हसेलं
त्याचं हसण पाहून
आपला आळस निघुन जाईल
दिवसाची सुरवात एखदम झक्कास होईलं
पण हो....
आपण हसलो हे मात्र
आरशाला सांगून द्यायचं
कारण तो विसराळू असतो
अनेकांच्या चेहऱ्यावरची
मरगळ दिवसभर पुसत असतो
आहो....
या माणसांच्या गर्दीत आपण रोज किती दुःखी चेहरे बघतो
नैराश्याने जडं झालेल्या
चेहऱ्यासाठी
कुठेतरी हासु शोधत असतो
खर सांगुका....
आपला चेहरा प्रसन्न असला की
दुसऱ्याला त्याच्या हेवा वाटतो
हसऱ्या चेहऱ्यावरच हसणं पाहून तो
नव्याने जगायला सुरवात करतो
खरतर....
या जगात सुख समृद्धीचा धनी कोणीच नाही तरीही
एकमेकांच हसु घेवून
माणूस आनंदात दिसतो
चेहऱ्यावरचे भाव आरशात बऱ्याचदा बघतो
चारहीबाजूने माणसाच्या वाटेला नैराश्यच असते
ठरवले तरिही चिंता विवंचना पिच्छा सोडत नसते
अशावेळी सारकाही विसरून एकांतात
स्वतःच हाश्यानंद करायचा
आणि आपल्या जगण्याला नवा अर्थ द्यायचा
कारण....
एक छोट्याशा
हसण्यातून चेहऱ्यावरचे किती संदर्भ बदलतात
तेव्हाकुठे मुखवट्याच्या हाश्यलकीरा सुंदर दिसतातं
म्हणून हे जीवन क्षणभंगुर आहे
बिनधास्त हसायच
फुला सारखे फुलतं रहायचं
*संजय धनगव्हाळ*
धुळे
९४२२८९२६२८
Comments
Post a Comment
Did you like this blog