Posts

Showing posts with the label चौधरी चरण सिंग

◼️ ललित लेख :- भारताचे पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचा एक किस्सा ...

Image
मळके कपडे घातलेला शेतकरी जेव्हा पोलिस ठाण्यात गेला - ठाण्यात असं काही घडलं की, संपूर्ण ठाणेच झाले निलंबित..   🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 ही गोष्ट सन १९७९ ची आहे. अंदाजे संध्याकाळचे सहा वाजले असतील. इटावा जिल्ह्यातील उसराहार पोलीस ठाण्यात एक शेतकरी आला होता, ज्याच्या अंगावर अतिशय मळके व चुरगळलेले कपडे होते. चेहऱ्यावर मात्र त्याच्या अतिशय तेज दिसून येत होते. पोलीस ठाण्यातील एकही कर्मचारी त्या शेतकऱ्याकडे लक्ष देत नव्हता. कदाचित त्याला काहीतरी तक्रार दाखल करावयाची असेल. ठाण्यात चौकशी करत तो एका पोलिसाजवळ गेला व तक्रार करायची म्हणून सांगू लागला. पोलिसांनी त्याला कशाची तक्रार करायची म्हणून विचारलं असता, "माझा बैल चोरीला गेला आहे व त्याबद्दल मला तक्रार करायची आहे" असं त्या शेतकऱ्याने सांगितले. त्या शेतकऱ्याच्या एकंदरीत पेहरावाकडे पाहून, तो पोलिस त्याच्यावर संतापला व त्यालाच उलट-सुलट प्रश्न करू लागला. 'बैल कसा चोरीला गेला ? नीट सांभाळता येत नव्हता का ?' तू काय करत होतास ? यासारख्या प्रश्नांची सरबत्तीच त्या पोलिसाने लावली होती. बिचारा शेतकरी इतक्या साऱ्या प्रश्नां