भवानी तलवारीचे गूढ - इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार कुठे आहे, हा एक मोठा गूढ प्रश्न आहे. लोकमान्य टिळकांच्या काळापासून हा प्रश्न अधूनमधून चर्चेत येतोच, त्यावरून रान पेटते आणि मग तो पुन्हा बासनात जातो, असे घडताना दिसत आहे. इंग्लंडमध्ये बकिंगहॅम राजवाड्यात भवानी तलवार आहे, अशी एक समजूत आहे. लोकमान्य टिळकांनी ही तलवार इंग्लंडमधून परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करणारी एक कविता गोविंदाग्रजांनी (राम गणेश गडकरी) लिहिली होती. 1980मध्ये बॅ. अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना, तर त्यांनी भवानी तलवार महाराष्ट्रात आणणारच अशी घोषणा करून मोठी मौज केली होती. त्यासाठी त्यांनी लंडनवारीही केली होती. तिकडून त्यांनी भवानी तलवार नाही आणली, पण तिचे चित्र तथाकथित चित्र मात्र आणले. यानंतर भवानी तलवार पुन्हा चर्चेत आली ती केंद्रात भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा. जून 2002मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवानी स्पेनच्या पाच दिवसीय भेटीवर गेले होते. त्यावेळी स्पेनमधील काही संशोधकांनी सांगितले, की शिवाजी महाराजांची भवानी तलवार स्पेनमधील तोलेदो या शस्त्रास्त्रे निर्मितीसाठी न