Posts

Showing posts with the label जिवन विचार - 120

जिवन विचार - 120

*मनुष्य हा समाजशिल प्राणी आहे. एकमेकांच्या मदतीने त्याने स्वतःचा विकास करून घेतला.या विकासाला सहकार या तत्वाचा हातभार लाभला.' जे काम एकट्याने करणे शक्य नाही , ते अनेकांचे हात एकत्र आल्याने अगदी सहजसाध्य होते '.*              *गवताची एक काडी अगदी कुचकामी असते. पण अशा अनेक काड्या एकत्र करून वळलेला दोर मदमत्त हत्तीलाही बांधून ठेवू शकतो.* *सहकाराचे हे महत्त्व ज्यांनी ओळखले , त्यांनी एकमेकांना सहाय्य केले आणि अशक्य वाटलेली पर्वतासमान कामे चुटकीसरशी पार पाडली.*       *स्वातंत्र्योत्तरकाळात आपल्या देशाने हा मंञ शिरोधार्य मानला.* *' विनासहकार , नाही उद्धार !'*