जिवन विचार - 93
कर्मातून नव-निर्मिती व्हायला पाहिजे. यासाठी परिश्रमाची गरज आहे.कमळ जगाला आनंद देत असते , पण त्याची निर्मिती चिखलातून होत असते. नवसर्जनाची क्रिया ही मूलतः आनंददायीच असते. कर्माचा हेतू आनंदलब्धी आणि आनंदशुध्दी असा दुहेरी असायला पाहिजे. आनंद तर प्राणीमाञास उपलब्ध आहे. किंबहुना आत्म्याचे ते स्वरूपच आहे. कर्म राजसिक अथवा तामसिक असते. मानवतेच्या संतोषासाठी केलेले कर्मच शुद्ध असते , सात्त्विक असते.