गुगल विषयी अप्रतिम टिप्स
सहसा कोणालाही माहित नसलेल्या गुगलच्या लय भारी ट्रिक्स….! बहुतेक लोकांना हे माहित नसेल की, गुगल हे फक्त एक सर्च इंजिन नसून अजून बरेच काही आहे. जर आपल्याला गुगलमध्ये लपलेल्या रंजक गोष्टी माहित पडल्या तर आपल्यासाठी गुगल हे एक मनोरंजनाच संपूर्ण पॅकेज आहे. चला मग जाणून घेऊया गुगलमध्ये कोणत्या रंजक गोष्टी लपलेल्या आहेत… १. बॅरेल रोल… गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर त्याच्या सर्च बॉक्समध्ये “Do a barrel roll” हे वाक्य टाईप करून एन्टर केल्यानंतर तुमची स्क्रीन वर्तुळाकार गोल फिरेल. २. द अटरी ब्रेकआउट गेम जर तुम्ही खूप कंटाळलेले असाल आणि तुम्हाला काही मनोरंजक खेळ खेळायचे असतील तर तुम्ही गुगलचा अटरी ब्रेकआउट हा गेम खेळू शकता. गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर त्याच्या सर्च बॉक्समध्ये तुम्ही “Atari breakout” हे वाक्य टाईप करून एन्टर केल्यानंतर जी सर्वात पहिली प्रतिमा येईल त्यावर क्लिक केल्यानंतर हा गेम सुरू होतो. ३. गुगलच्या क्षेत्राशी काही प्रयोग करू इच्छित असाल तर… आपल्यातील बहुतेकांना हे माहित नसेल, गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर त्याच्या सर्च बॉक्समध्ये “Google Sphere” हे टाकून झाल्यानंतर लग...