जिवन विचार - 108
दूध आणि पाणी एकत्र मिसळले असता त्यातील फक्त दूध प्राशन करणे आणि पाणी टाकून देणं हा अत्यंत दुर्लभ गुण राजहंसाजवळ आहे.हा गुण मानवी मनाला मोहीत करून सोडतो. तसं पाहील तर राजहंस आणि बगळा या दोन्ही पक्षांचा रंग पांढरा असतो , परंतु दोघांच्या स्वभावधर्मात जमीन-आसमानचा फरक आहे. चांगल्याची निवड करणारा हंस कुठं आणि एका पायावर उभा राहून क्षणात मासा गिळकृंत करणारा बगळा कुठं ? रंगाने सारखे असलेले हे दोन पक्षी स्वभावानं मात्र भिन्न आहेत . या जगात गुण-दोष असलेली असंख्य माणसं आढळतात. माणसांच्या ठिकाणी असलेले गुण घ्यावेत आणि अवगुण टाकून द्यावेत. जीवनात माणसाला यशस्वी व्हायचे असेल तर नीरक्षीरविवेक बुद्धी बाळगली पाहिजे. समाजात वावरताना हंस आणि बगळे निवडता आले पाहिजेत. म्हणून अनुभवाच्या कसोटीवर माणसं पारखून घ्यावी लागतात.