जिवन विचार -16
एकाग्रता साध्य करण्यासाठी मनुष्याच्या डोळ्यांपुढे एखादे विधायक ध्येय आणि त्याला अनुरुप विधायक साधना पाहिजे. पर्वताच्या माथ्यावर पडणारे पाणी जर नाना दिशांना वाहत गेले , तर ते कोठेच राहत नाही, सारे नाहीसे होते. परंतु तेच पाणी जर एका दिशेने वाहत जाईल तर त्या पाण्याची पुढे नदी होईल , तिच्यातून शक्ती उत्पन्न होईल, तिचा देशाला उपयोग होईल. त्याप्रमाणे मनुष्य आपली शक्ती नाना प्रकारच्या उद्योगांत न दवडता ती एकत्र करून एकाच कार्यात सुव्यवस्थितपणे ओतील तरच त्याच्या हातून काही कार्य होईल. यालाच गीतेने🙏 ' स्वधर्म ' हे नाव दिले आहे.