Posts

Showing posts with the label संघर्ष - बोधकथा

संघर्ष - बोधकथा

 बॅड पॅच- एक संघर्ष.. प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी 'बॅड पॅच' येतो. शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात  करीयर मध्ये काहीतरी बिघडतं,  नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं,  व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो,  पैशांची बिकट  वाट लागते...नड येते आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!! हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो... आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो... आयुष्य नकोसं करुन सोडतो... आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो.... ... संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो... अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो... कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!! यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे: १. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं! २. आपली स्वतःची आपल्याला नव्या...