◾कविता : भाग्य काट्याचे उजळले... | संजय धनगव्हाळ
नाजुक साजुक पाय तिचे
भाग्य काट्याचे उजळले
रुतून पायात तिच्या
अन् काळीज तळमळले
नशीब काय म्हणावे
त्या वाटेचे की
तिने चालत रहावे
पाहुन तिला येताना
काट्यांनी धावत जावे
विव्हळते नाजुकशी ती
अन् अश्रु गालावर ओघळते
काट्याने काटा काढून
पायवाट तिची लाल होते
टोचावे तरी कितीदा काट्यांनी
आणि घाव तरी कती द्यावे
अडवून वाट तिची
का तिला रडवावे
तिला रडताना पाहून सारे
सहानुभूती कोणी दाखवत नाही
काटा पायात घेवून ती
चालणे सोडत नाही
येणेजाणे तिचे त्या वाटेवरचे
उगाच छळून का जखम द्यावी
तिच्या रक्ताळलेल्या पावलांना
एकदातरी फुकंर घालावी
जरा समजुन घ्यावे काट्यांनी
वेदना तिच्या पायांची
टाकून द्यावा सडा
करावी वाट फुलांची
करून द्यावी वाट मोकळी
आणि दुरून तिला पहात रहावे
नकळत टोचेल जो काटा पायात तिच्या
मग त्याला भाग्यवंत म्हणावे
*संजय धनगव्हाळ*
९४२२८९२६१८
Comments
Post a Comment
Did you like this blog